*वसुने केली, लकीची बोलती बंद !*
*लकी आणि वसुंधराच्या लग्नाचा फोटो जयश्रीच्या हातात पडेल ?*
*'पुन्हा कर्तव्य आहे'* मध्ये वसुच्या आयुष्यात लकी नावाचं वादळ घोंगावतय. दिवाळीत लकी बनीला हातात फटाका फोडायला शिकवतो, पण वसू त्याला तसं करण्यापासून थांबवते. दिवाळी साजरी करताना संपूर्ण फॅमेली सत्य आणि धाडस हा खेळ खेळायचं नियोजन करतात. यात लकी वसूला 'सत्य' निवडायला लावतो आणि *"मला वसू वाहिनीबद्दल एक गुपित माहीत आहे* असं म्हणून तिला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करतो. लकी वसूला सांगतो, "मी सर्वांसाठी सारखेच गिफ्ट आणले आहेत, पण एका गिफ्ट रॅपमध्ये आपल्या लग्नाचा फोटो आहे.
तुला तो फोटो कोणत्या गिफ्टमध्ये आहे ते शोधायचं आहे. हे ऐकून काय असेल वसुंधरेची मनस्थिती ? हा फोटो जयश्रीच्या हातात तर पडणार नाही ना ? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी पहायला विसरू नका 'पुन्हा कर्तव्य आहे' दररोज रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.