उदयोन्मुख सर्जनशील कलावंतांसाठी एक व्यासपीठ
स्थापनेपासूनच या महत्त्वपूर्ण उपक्रमाने ईशान्य भारतातील राज्ये आणि जम्मू आणि काश्मीरसह भारताच्या कानाकोपऱ्यातील 225 युवा सर्जनशील प्रतिभावंतांना आकर्षित केले आहे. जागतिक स्तरावर अशा प्रकारचे सार्वधिक पाठिंबा असलेले हे व्यासपीठ सिनेमाच्या माध्यमातून कथा सांगणाऱ्या भावी पिढीची जडणघडण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा दाखला आहे.
100 क्रिएटिव्ह माइंड्सची निवड
यावर्षी ओरिसा, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, झारखंड, मेघालय, मिझोराम ही राज्ये आणि पाँडेचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटे यांसारख्या केंद्रशासित प्रदेशांसह भारताच्या कानाकोपऱ्यातून 13 वेगवेगळ्या चित्रपट प्रकारांमधील सुमारे 1,070 प्रवेशिकांसह सीएमओटीला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. दिग्दर्शन श्रेणीमधून सर्वाधिक प्रवेशिका आल्या, त्याखालोखाल केशभूषा आणि मेक-अप आणि सिनेमॅटोग्राफीसाठी आल्या.
निवड प्रक्रियेमध्ये दोन टप्प्यातील मूल्यांकन समाविष्ट होते:
निवड परीक्षक : चित्रपट उद्योगातील पुरस्कार-विजेत्या व्यावसायिकांनी लघुपट, शो रील, पोर्टफोलिओ आणि म्युझिक फाईल्ससह सर्व प्रवेशिकांचा आढावा घेतला , त्यातून विविध प्रकारात सुमारे 300 जणांची निवड करण्यात आली.
ग्रँड ज्युरी: चित्रपट उद्योगातील दिग्गज आणि ज्येष्ठ चित्रपटकर्मींचा समावेश असलेल्या, ग्रँड ज्युरीने चित्रपटांच्या सर्व प्रकारांमधील अंतिम 100 सहभागींची निवड करण्यासाठी छाननी केलेल्या अर्जांचे बारकाईने मूल्यांकन केले.
निवड प्रक्रियेमध्ये दोन टप्प्यातील मूल्यांकन समाविष्ट होते:
निवड परीक्षक : चित्रपट उद्योगातील पुरस्कार-विजेत्या व्यावसायिकांनी लघुपट, शो रील, पोर्टफोलिओ आणि म्युझिक फाईल्ससह सर्व प्रवेशिकांचा आढावा घेतला , त्यातून विविध प्रकारात सुमारे 300 जणांची निवड करण्यात आली.
ग्रँड ज्युरी: चित्रपट उद्योगातील दिग्गज आणि ज्येष्ठ चित्रपटकर्मींचा समावेश असलेल्या, ग्रँड ज्युरीने चित्रपटांच्या सर्व प्रकारांमधील अंतिम 100 सहभागींची निवड करण्यासाठी छाननी केलेल्या अर्जांचे बारकाईने मूल्यांकन केले.
विस्तारित चित्रपट निर्मिती प्रकार
आपला आवाका आणखी वाढवत सीएमओटी 2024 ने 13 विशेष चित्रपट निर्मिती प्रकारांवर लक्ष केंद्रित करून आपली क्षितिजे विस्तारली आहेत, ज्यामध्ये नव्याने समावेश केलेले व्हॉईस ओव्हर/डबिंग श्रेणी तसेच स्वतंत्र केशभूषा आणि मेकअप विभाग आहेत. कार्यक्रमात आता पुढील बाबींचा समावेश आहे :
दिग्दर्शन
अभिनय
सिनेमॅटोग्राफी
एडिटिंग आणि सबटायटलींग
पटकथालेखन
पार्श्वगायन
संगीत रचना
वेशभूषा
कला दिग्दर्शन
ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स), ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर), आणि व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर)
केशभूषा आणि मेकअप
साउंड रेकॉर्डिंग
व्हॉईस ओव्हर/डबिंग
उत्कंठावर्धक कार्यक्रम आणि संधी
सीएमओटी 2024 हा सहभागींसाठी उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारा अनुभव असेल. 100 सीएमओटी गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत एका समृद्ध प्रवासाला निघतील, आणि एका व्यापक कार्यक्रमात सहभागी होतील, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
दिग्गजांबरोबर मास्टरक्लासेस: या वर्षीच्या सीएमओटी कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या नेतृत्वाखालील मास्टरक्लास पहायला मिळणार आहे. या सत्रांमध्ये अभिनय, पिचिंग, लेखन आणि पोस्ट-प्रॉडक्शनसह चित्रपट निर्मितीच्या विविध बाबींचा समावेश आहे. यामध्ये :
अभिनयाच्या कलेवर प्रभुत्व मिळवणे: भारतातील आघाडीचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांचे अस्सल कला सादरीकरणासाठी मार्गदर्शन
द आर्ट ऑफ पिचिंग: द स्टोरी इंकचे संस्थापक सिद्धार्थ जैन यांचे निर्माते, वितरक आणि गुंतवणूकदारांसाठी परफेक्ट पीच साठी मार्गदर्शन
क्राफ्टिंग सिनेमॅटिक हार्मनी: ब्रिज पोस्टवर्क्स (ऑनलाइन) येथील प्रख्यात कलरिस्ट पृथ्वी बुद्धवरपू यांचे डीआय आणि कलर ग्रेडिंग संदर्भात मार्गदर्शन
लेखकाची प्रक्रिया: प्रख्यात पटकथालेखक चारुदत्त आचार्य यांचे संशोधन ते दृश्य लेखन याबाबत मार्गदर्शन
जागतिक मान्यता मिळवण्याचा राजमार्ग : अ लिटिल अनार्की फिल्म्सचे संस्थापक कोवल भाटिया यांचे स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि प्रयोगशाळांचा शोध यावर मार्गदर्शन
रिअल टू रील: वायआरएफ स्टुडिओजमधील चित्रपट निर्माते सैफ अख्तर यांचे माहितीपट निर्मितीची कला आणि वाव यावर मार्गदर्शन