https://www.youtube.com/watch?v=dvAq_wgiK0U
*राम बंधू आणि रॉबिन हूड आर्मी #StopFoodWastage चळवळीअंतर्गत 'एक विचार' अभियानासाठी आले एकत्र*
*मुंबई, 28 ऑक्टोबर 2024 :* अन्नपदार्थांची नासाडी ही समस्या भारतातील घरांना आणि व्यवसायांना सारख्याच प्रमाणात भेडसावणारी समस्या आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या ताज्या अहवालानुसार भारतात दर वर्षी दरडोई तब्बल ५५ किलो अन्नपदार्थ वाया जाता जातात तर दुसरीकडे भारतातील १३ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या कुपोषणग्रस्त आहे. मन हेलावून टाकणारा हा विरोधाभास ही दीर्घ काळापासून एक गंभीर समस्या होऊन राहिली आहे आणि समाजातील सर्व स्तरांकडून सामुहिकदृष्ट्या ही समस्या हाताळणे गरजेचे आहे.
याच संदर्भात राम बंधू या आघाडीच्या अन्नपदार्थ उत्पादनांच्या ब्रँडने रॉबिन हूड आर्मीसोबत हातमिळवणी केली आहे. रॉबिन हूड आर्मी ही स्वयंसेवकांचा एक गट आहे. ते अतिरिक्त अन्नपदार्थांचे पुनर्वितरण करतात. भारतीय जनमानसात अन्नपदार्थांच्या नासाडीला आळा घालण्यासाठी जागरुकता निर्माण करणे हे या सहयोगाचे उद्दिष्ट आहे. यासाठीच त्यांनी 'स्टॉप फूड वेस्टेज' चळवळ सुरू केली आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून राम बंधू या ब्रँडतर्फे विचारांना चालना देणारा 'एक विचार' हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे. यात एक रोचक कथानक सादर करण्यात आले आहे. या कथानकाच्या माध्यमातून अन्नपदार्थांचे सेवन कशा प्रकारे केले जाते आणि ते कशा प्रकारे टाकून दिले जातात हे प्रेक्षकांना दाखविण्यात आले आहे. या कथेत एक सामान्य भारतीय कुटुंब दाखविले आहे. या कुटुंबातील लहान मुले अनेक प्रसंगी अन्नपदार्थ टाकून देतात आणि त्यांना त्यांचे गांभीर्य समजत नाही. शेवटी, या चित्रपटातून अन्नपदार्थ वाया न घालविण्याचा एक प्रभावी संदेश देण्यात आला आहे.
रॉबिन हूड आर्मीसारख्या संस्था या अतिरिक्त अन्नपदार्थ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करतात आणि या लघुपटात दाखविल्याप्रमाणे अशा संस्थांच्या मदतीने आणि ताटात राहिलेले अन्न, इतर कुणालाही त्रास न देता, समाजातील भटक्या प्राण्यांना देण्यासारख्या सोप्या कृतीने, ही दुर्लक्षित राहिलेली समस्या हाताळण्यात सिंहाचा वाटा उचलला जाऊ शकतो.
या जागरुकता चळवळीबद्दल मत व्यक्त करताना राम बंधू या ब्रँडची कंपनी एम्पायर स्पाइसेस अँड फूड लि.चे (ईएसएफएल) मार्केटिंग हेड श्री. भानुदास गुंडकर म्हणाले, "अन्नपदार्थ कॅटेगरीमधील एक आघाडीचा एफएमसीजी ब्रँड म्हणून, समाजात अस्तित्वात असलेल्या अन्नपदार्थ वाया जाण्याच्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकणे आणि या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना सुचवणे, आमचे कर्तव्य आहे, असे आम्हाला वाटले. म्हणून आम्ही या लघुपटाची निर्मिती केली.
हा चित्रपट डिजिटल माध्यमात प्रदर्शित करण्यात आला आहे आणि या लघुपटात चिन्मय उद्गीरकर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती अमेझ प्रोडक्शन्सने केली आहे तर डिजिशेफ्स यांची ही संकल्पना आहे.
माधुरी दीक्षित-नेने या राम बंधू मसाले, लोणची आणि पापड उत्पादनांच्या ब्रँड ॲम्बेसेडर आहेत.
ईएसएफएलच्या ब्रँड पोर्टफोलियोमध्ये राम बंधू, आरबीएम, टेम्प्टिन आणि जायका हे ब्रँड्स आहेत. या उत्पादनांची चव, प्रकार आणि त्यांच्यामुळे मिळणारी सुविधा यासाठी हे ब्रँड्स लोकप्रिय आहेत. भारतातील १४ राज्यांमधील तब्बल पाच लाख रिटेल दुकानांमध्ये या कंपनीची उत्पादने उपलब्ध आहेत. या कंपनीतर्फे यूएस, यूके, कॅनडा, स्पेन, फ्रान्स, न्यूझीलंड, कतार, दुबई, जर्मनी, नेदरलँड्स, लक्झमबर्ग इत्यादी देशांमध्ये उत्पादने निर्यात करण्यात येतात.
*Media Queries – Shraddha 9869100555 Aishwarya 8828936449 ashwinipublicity@gmail.com*