*बिग बॉस विजेता सुरज चव्हाण च्या "राजाराणी" चित्रपटावर अन्याय.*
*माझ्या राजाराणी चित्रपटावर अन्याय होतोय सर्वांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या - सुरज चव्हाण.*
*आमचा चित्रपट आम्ही उतरवनार नाही , चित्रपट सुरूच राहणार - रोहन पाटील*
*ज्यांना राजाराणी चित्रपटाला विरोध करायचा आहे त्यांनी माझ्या बरोबर बसून एकदा चित्रपट बघा - निर्माते गोवर्धन दोलताडे*
*भयंकर कष्टातून आम्ही चित्रपट बनवला - शिवाजी दोलताडे*
18 ऑक्टोबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला "राजा राणी" चित्रपट हा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच बिग बॉस जिंकून आलेला आणि सर्वांच्या मनावर राज्य करत असलेला सुरज चव्हाण यांनी काम केलेला 'राजाराणी' चित्रपट बॅन करा अशी ॲड वाजीद खान यांनी मागणी केली आहे.
ॲड वाजीद खान यांच्या म्हणण्या नुसार अस येत की 'राजाराणी' चित्रपट पाहिल्यावर मुले मुली आत्महत्या करतील, पण हा चित्रपट खूप काही चांगले सांगणारा आहे , ह्या चित्रपटातून मुला मुलींनी खूप शिकण्या सारखं आहे असं चित्रपटाचे लेखक निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी म्हणाले आहे , आमच्या चित्रपटावर जाणून बुजून अन्याय होतोय , प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रेम द्या सपोर्ट करा असं यावेळी बिग बॉस विजेता सुरज चव्हाण सुद्धा बोलला , खूप शून्यातून आणि खूप कष्टातून आम्ही हा "राजाराणी" चित्रपट बनवला आहे , आम्ही हा चित्रपट उतरवणार नाहीत , लोक आमच्या वर भरभरून प्रेम करतील , आमच्यावर होणार अन्याय मोडून काढतील अस देखील यावेळी चित्रपटाचा प्रमुख अभिनेता रोहन पाटील मनाला , खूप मोठे कलाकार आणि खूप चांगली स्टोरी असलेला आमचा राजाराणी चित्रपट आम्ही बॅन होऊन देणार नाही , आणि लोक चित्रपटावर भरभरून प्रेम करतील अशी यावेळी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले