Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाराणी आणि परीराणीच्या विश्वात घेऊन जाणारी तुमच्या आमच्या घरातील गोष्ट आता पहा घरबसल्या

 महाराणी आणि परीराणीच्या विश्वात घेऊन जाणारी तुमच्या आमच्या घरातील गोष्ट आता पहा घरबसल्या

रविवार २० ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार नाच गं घुमा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर


 


चार वर्ष सातत्याने नंबर वन रहात स्टार प्रवाह वाहिनीने मराठी मनोरंजन वाहिन्यांच्या विश्वात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. मराठी परंपरामराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत भरभरुन मनोरंजन देण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने नेहमीच प्रयत्न केला आहे. अनेक उत्तमोत्तम मालिकांसोबतच नवनवे दर्जेदार चित्रपट स्टार प्रवाह वाहिनी सादर करीत असते. वेडझिम्माबाईपण भारी देवापावनखिंड यासारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर स्टार प्रवाहवर नाच गं घुमा या नव्याकोऱ्या चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना घरबसल्या घेता येणार आहे. नोकरदार महिला आणि तिच्या दैनंदिन आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग असणारी मोलकरीण बाई यांच्या नात्याची गंमतीशीर गोष्ट नाच गं घुमा चित्रपटातून मांडण्यात आली आहे. फक्त महिला वर्गच नाही तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट आपलीशी वाटेल. मुक्ता बर्वेनम्रता संभेरावसुकन्या कुलकर्णीसुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊतमधुगंधा कुलकर्णी यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट प्रत्येकानेच पाहायला हवा.


नाच गं घुमा च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरविषयी सांगताना स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चरचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, स्टार प्रवाह वाहिनी नेहमी दर्जेदार आशय रसिकांना देत असते. नाच गं घुमा अशीच एक धमाल पण रोजच्या जीवनातील संबंधित चित्रपट आहे जो आशय आणि करमणुकीची सुंदर सांगड घालून देतो. घरातल्या प्रत्येकासाठी हा चित्रपट रसिकांसाठी करमणुकीची मेजवानी असेल.

तेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पाहायला विसरु नका नाच गं घुमा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार २० ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.