*"मनापासून प्रयत्न केल्याने मला अस्सल मराठी बोलता आले" ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेमधील हितेश भारद्वाज ऊर्फ रजतने मराठी भाषा शिकण्याचा अनुभव केला कथन*
‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेच्या भेदक आणि स्वारस्यपूर्ण कथानकामुळे या मालिकेने एक निष्ठावंत प्रेक्षक कमावला आहे. मालिकेने अचानक जी वळणे घेतली आहे, त्यामुळे दर्शकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यात ही मालिका पुरती यशस्वी झाली आहे. हितेश भारद्वाज आणि भाविका शर्मा ही या मालिकेतील मुख्य पात्रे आहेत. हितेश भारद्वाज रजत ठक्करची व्यक्तिरेखा साकारताना दिसतो तर सावीची भूमिका भाविका शर्मा हिने आणि अमायरा खुराना हिने साईशा (साई) ही भूमिका निभावली आहे.
‘गुम है किसीके प्यार में’ मालिकेचे सद्य कथानक सावी, रजत आणि साई यांच्याभोवती फिरते, ज्यातून भावनिक गुंतागुंत अधोरेखित होते. या मालिकेच्या ताज्या ‘प्रोमो’मध्ये, दर्शकांना रजतच्या व्यक्तिमत्त्वाच्या आश्चर्यकारक पैलूची ओळख करून दिली आहे, ज्यामुळे स्वत:चे यश कमावण्याचे ध्येय साध्य करण्यात त्याचीच वृत्ती कशी आड येते आणि लवकरच नकारात्मक वळण कशी घेते, हे पाहायला मिळेल. ‘प्रोमो’मध्ये सुरुवातीला रजत गुजरातीत बोलून सावीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, तिला भाषा समजत नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर, तो तिच्याप्रति संवेदना व्यक्त करताना तिच्याशी मराठीतून बोलू लागतो. त्याने अवगत केलेल्या मराठी बोलण्याच्या कौशल्याबाबत सावीचा अभिप्राय काय आहे, याचा तो तिच्या अभिप्रायातून उत्सुकतेने शोध घेत असल्याचे दिसून येते. तरीही, तो तसे करण्याबाबत किती प्रामाणिक आहे, याबाबत जेव्हा सावी खेळकरपणे त्याला चिडवते, तेव्हा रजतचा मूड नाट्यमयरीत्या बदलतो. तिच्या हलक्याफुलक्या टोमण्यांनी तो तिच्यावर कमालीचा चिडतो. त्यामुळे सावीचे मन उद्ध्वस्त होते. यामुळे रागावर ताबा ठेवण्याच्या आणि त्यात बदल करण्याच्या रजतच्या क्षमतेविषयी प्रश्न निर्माण होतो. त्याचे औदासिन्य एक चांगली व्यक्ती होण्याच्या त्याचे प्रयत्न नेहमीच झाकोळून टाकते, यामुळे कदाचित तो स्वत:ला खलनायक म्हणून ठरवेल का? रजत आणि सावी यांच्यात जो बंध आहे, त्याची क्षमता ते कधी ओळखू शकतील का, की हे गैरसमज त्यांना सतत विलग ठेवतील?
’स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेतील हितेश भारद्वाज ऊर्फ रजत मनोगत व्यक्त करताना सांगतो- “गुम है किसीके प्यार में या मालिकेच्या नव्या प्रोमोत, प्रेक्षकांना सावी आणि रजत यांच्यात असलेल्या समीकरणातील गुंतागुंतीच्या बारकावे बघायला मिळतील. रजत हे एक पात्र आहे, जो आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही आणि त्या दाबून टाकूही शकत नाही. अभिव्यक्त होण्याच्या त्याच्या प्रयत्नांतून, एक मोठे नाट्य उलगडत असताना अनपेक्षित स्थिती निर्माण होते. ते आव्हानात्मक होते, तरीही मनापासून तयारी केल्याने मला अस्सल मराठी बोलता आले. जेव्हा तुम्ही दोन भाषा बोलता, तेव्हा त्यावर तुमची हुकूमत असणे आवश्यक आहे आणि मला ते बोलताना वास्तववादी बोलायचे होते. आयुष्य हृदयाच्या ठोक्यासारखे आहे; त्यात चढ-उतार असू शकतात, पण जेव्हा ती सरळ रेषा बनते, तेव्हा गोष्टी संपतात."
कथा जसजशी उलगडत जाते, तसतसे सावी आणि रजत त्यांच्या कोलाहल माजलेल्या नातेसंबंधातून कसा मार्ग काढतात आणि वरवर पाहता, अगदी परिपूर्ण वाटणारे संबंध स्वीकारण्यासाठी ते त्यांच्यातील मतभेद बाजूला ठेवू शकतात का, हे पाहणे रंजक ठरेल. सतत बदलणारी त्यांच्या या प्रवासातील वळणे पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
तर मग- ‘स्टार प्लस’ वाहिनीवर रात्रौ ८ वाजता ‘गुम है किसीके प्यार में’ ही मालिका बघायला विसरू नका. या मालिकेची निर्मिती राजेश राम सिंग, पिया बाजपी, प्रदीप कुमार आणि शैका परवीन यांनी केली आहे.