*लखलखत्या ताऱ्यांचा, झगमगता नामांकन सोहळा !*
‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ नामांकन सोहळ्यात जसजशी एका एका मालिकेची नामांकनं जाहीर होत होती, तसतशी कलाकारांची उत्कंठा अधिकच वाढत होती. प्रत्येकजण फक्त आपल्या मालिकेच्या कलाकारांनाच नाही तर दुसऱ्या कलाकारांच्या मालिकेलाही तेवढच समर्थन करताना दिसले. नामांकनासोबत स्टेजवर आणखीन एक कार्यक्रम रंगला तो म्हणजे सध्या चर्चेत असलेला क्रेटेक्स, जगप्रसिद्ध डीजे आणि संगीत निर्माता तो ही 'झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ नामांकन सोहळ्यात सहभागी झाला आणि आपल्या सुप्रसिद्ध गाणं 'तांबडी चामडी' वर सगळ्या कलाकारांना थिरकवले.
*अभिजीत खांडॆकरच खुमासदार सूत्रसंचालन कलाकारांची धम्माल मज्जा मस्ती आणि उत्तोरोत्तर रंगत गेलेला हा नामांकन सोहळा आपल्याला पहाता येणार आहे २० ऑक्टोबरला संध्या. ५ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*