*ऑक्टोबरमध्ये अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर हॉलीवूड आणि साऊथचे धमाकेदार चित्रपट!*
*मुंबई १४ ऑक्टोबर २०२४ :* ऑक्टोबरमध्ये अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर तुम्हाला पाहायला मिळणार एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट. साऊथपासून ते हॉलीवूडपर्यंतचे सर्व ब्लॉकबस्टर चित्रपट मराठीमध्ये तुमच्या भेटीला येत असून या चित्रपटांची मज्जा तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत घेऊ शकता. चला तर मग पाहूया, ऑक्टोबरमधील ते चित्रपट कोणते आहेत...
Iravan (मी रावण)
'इरावण'(मी रावण) हा कन्नडचा थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन रॅम्स रांगा यांनी केले आहे. हा चित्रपट ४ ऑक्टोबर २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हि कहाणी एका परदेशी शिकत असणाऱ्या मुलाची आहे, त्याला अचानक एके दिवशी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळते. हे त्याला समजताच त्याला थोडा संशय येतो, आणि मग तो खून करण्यामागे कोण आहे, हे शोधण्यासाठी तो आक्रमक होतो.त्याच्या या प्रवासात तो सत्याच्या मागे लागतो आणि वडिलांना न्याय मिळवण्यासाठी लढतो.
Unknown caller (अपरिचित कॉलर)
'अपरिचित कॉलर' हा हॉलीवूडमधील सुपरहिट चित्रपट अमरिअह ओल्सन आणि ओबीं ओल्सन यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे. कथा एका मनोरुग्णाबद्दल आहे, जो एका अपरिचित कुटुंबाला त्यांच्या हाईटेक सिक्युरिटी सिस्टिमचा वापर करून घाबरवतो. तो टाइम बॉम्बच्या मदतीने ९० मिनिटांत "मी कोण आहे?" या प्रश्नाचे उत्तर मागतो. सस्पेन्सने भरलेला हा चित्रपट पाहण्यास तुम्हाला नक्कीच मज्जा येईल.
Adharmam- (अधर्म)
दोन भावांची कथा सांगणारा साऊथ चित्रपट ‘अधार्मम’ म्हणजेच ‘अधर्म’ १८ ऑक्टोबर २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार आहे. प्रमुख भूमिकेत असणारा धर्मा हा चंदनाचा स्मगलर आहे जो प्रत्येक तोडलेल्या झाडामागे एक रोपटं लावायचा. मात्र धर्माच्या निधनानंतर त्याचा भाऊ अर्जुन चंदनाचा व्यवसाय सांभाळला. पुढे राज्यभरात गुन्हेगारी वाढू लागली आणि हे राज्यच गुन्हेगारीला जवाबदार आहे असे सांगण्यात आले. आणि पुढे राज्यात काय झालं? चित्रपटात उलघडणार यामागचं खरं सत्य…
The Invisible Boy - (अदृश्य शक्ती)
हॉलीवूडमधील सुपरहिट ॲक्शन आणि ऍडव्हेंचरने भरपूर चित्रपट ‘द इन्व्हिसिबल बॉय’ म्हणजेच मराठीत 'अदृश्य शक्ती' २५ ऑक्टोबर २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ट्रायस्टे शहरात राहणारा मिशेल सिलेंझी एक लाजाळू तेरा वर्षीय मुलगा आहे ज्याचे शाळेत स्टेला नावाच्या मुलीवर प्रेम असते आणि तो फँसी-ड्रेस पार्टीत भाग घेऊन तिला इम्प्रेस करायचं बघतो. शाळेतील काही मस्तीखोर मुलं त्याचा पोशाख चोरतात, त्यामुळे त्याला नाईलाजाने एक वेगळा पोशाख घालावा लागतो, ज्यामध्ये अद्वितीय शक्ती असते. हळूहळू या पोशाखाची खरी ताकद कळते.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ, श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले,“आम्ही तुमच्यासाठी नेहमीच तासंतास मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्नशील असतो. शिवाय हे असे चित्रपट आहेत जे तुमच्या कुटुंबाला एकत्रित आणतील आणि भरपूर आनंद देतील.”
*Shraddha 9869100555 Aishwarya 8828936449 ashwinipublicity@gmail.com*