*'प्रेमास रंग यावे' सन मराठीवरील मालिकेत आदिनाथ कोठारे याची खास एंट्री – प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला!*
सन मराठीवरील लोकप्रिय मालिका 'प्रेमास रंग यावे' प्रेक्षकांना मनोरंजनासोबत एक सामाजिक संदेश देत आहे. या शोमध्ये अमृता फडके हि अक्षराच्या भूमिकेत दिसत आहे, जिथे ती संसार आणि जबाबदारीच्या संघर्षातून मार्ग काढताना दिसत आहे. अमृता हिच्या सशक्त अभिनयामुळे अक्षराची भूमिका अधिक भावपूर्ण वाटते.
या रोमांचक प्रवासात आता आणखी एक आकर्षण म्हणजे अभिनेता आदिनाथ कोठारे याची विशेष एंट्री ह्या मालिकेत होणार आहे . जो त्याचा आगामी चित्रपट पाणी ह्याचे प्रमोशन करताना दिसणार आहे. त्याच्या एंट्रीने प्रेक्षकांची आवड अजून वाढणार आहे. आदिनाथ यांची भूमिका आणि त्यांचा आगामी चित्रपट 'पाणी' याची चर्चा कथेच्या धाग्याशी जोडली जाणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना या भागाची अधिक उत्सुकता लागणार आहे.
'प्रेमास रंग यावे' सोम ते शनि रात्री ९:३० वाजता फक्त सन मराठीवर, नक्की पाहा आणि या प्रेरणादायी प्रवासाचा आनंद घ्या!