शर्वरीच्या फिटनेसची जबरदस्त झलक! *Monday Motivation* म्हणून फिट पॅडल प्लेयरच्या रुपात चाहत्यांची मने जिंकली
शर्वरीने सोशल मीडियावर आपल्या फिटनेसची झलक दाखवत सर्वांना सोमवारी शानदार मोटिव्हेशन दिले आहे! बॉलिवूडची "हिट-गर्ल" शर्वरीने यंदाच्या वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. १०० कोटींचा गल्ला जमवणाऱ्या मुंजा या चित्रपटातून शर्वरीने सगळ्यांच्या मनावर राज्य केले, ज्यात तिचं तरस हे वर्षातील सर्वात हिट गाणं ठरलं. हा चित्रपट दिनेश विजन यांनी निर्मित केला असून, दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे.
२०२४ मध्ये यशाचा सिलसिला कायम ठेवत शर्वरीने YRF च्या महाराज या जागतिक स्तरावर हिट झालेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली, त्यानंतर निखिल अडवाणींच्या वेदा मध्येही तिचा प्रभावी अभिनय पाहायला मिळाला. आता YRF स्पाय युनिव्हर्सच्या आगामी अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना, शर्वरीने फिट पॅडल प्लेयरच्या भूमिकेतून सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना प्रेरित केले आहे!
शर्वरीने तिच्या फिटनेस फोटोंसोबत लिहिले आहे: “#MondayMotivation देत आहे 🎾”
पोस्ट इथे पाहा: https://www.instagram.com/p/DBX-vuszmsx/?igsh=amkzeHVpdTQ5MTI4
सध्या शर्वरी अल्फा चित्रपटाच्या शूटिंगमुळे तिच्या फिटनेसच्या सर्वोच्च टप्प्यावर आहे. या चित्रपटात ती आलिया भट्टसोबत दिसणार आहे, आणि अल्फा २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन द रेल्वे मॅन फेम शिव रवैल करत आहेत.