*दिवाळी डबल धमाका 'पारू' आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन मालिकांचा महासंगम !*
दिवाळी म्हणजे सर्वत्र रोषणाई आणि एकमेकांना आनंद देणारा सण आहे आणि तेच करायला आपली लाडकी झी मराठी सज्ज आहे. या दिवाळी निमित्त दोन बालपणीच्या मैत्रिणी *'पारू* आणि *सावली'* एकत्र येणार आहेत. 'पारू' आणि 'सावळ्याची जणू सावली' या दोन लोकप्रिय मालिकांचा महासंगम होणार आहे. हा हृदयस्पर्शी क्षण पाहण्यासाखा असणार हे नक्की. त्यासोबत या दोन जिवलग मैत्रिणी आपल्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावर भेटून कोणत्या प्रसंगाला सामोरे जाणार. यासाठी बघायला विसरू नका *'पारू' आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन मालिकांचा महासंगम २८ ऑक्टोबरपासून संध्या. ७: वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*