*सूर्याच्या हातून होणार रावण दहन !*
*तुळजाच्या पायाशी सिद्धार्थ, सूर्याने दिलेलं वचन पूर्ण !*
*'लाखात एक आमचा दादा'* मालिका प्रत्येक दिवस मनोरंजक वळण घेत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत नवरात्री उत्सव सुरु आहे आणि तुळजाच्या आग्रहामुळे दादा तुळजासोबत दांडिया खेळायला तयार होतो. राजश्रीवर दांडियाच्या ठिकाणी देवीच्या दागिन्यांच्या चोरीचा आळ घेतला जातो. सूर्या आणि प्रसाद तो आळ खोडून काढतात. सूर्या आणि तुळजा दांडिया स्पर्धा जिंकतात. भोंडला करायचा म्हणून तुळजा तयारी करतेय. तर दुसरीकडे RTO मधून सूर्याला सिद्धार्थ बद्दल कळतं.
सूर्या त्याला पकडणार तेव्हाच तो त्याच्या हातातून निसटतो, पण सिद्धार्थची बॅग सुर्याच्या हाताला लागलेय. तुळजा गावातील ५ घरांमध्ये जोगवा मागायला जाते, त्यात एक घर जालिंदरचं आहे. आपण पहिल्या भागापासून पाहतोय दादाला देवीचा आशिर्वाद आहे आणि दादाचा नवरात्रीचा कडक उपवास सुरु आहे. यावर्षी उपवास सोडायचा मान सरनोबतांकडे आहे. इकडे दादाला बेशुद्ध करुन त्याला कोंडून ठेवण्याचा कट शत्रू रचतोय. आता *दादा स्वतःची सुटका करवून घेऊन पालखीच्या वेळी तिथे कसा पोहोचेल ? दादाने देवीची पालखी उचलल्यावर काय असेल दादाची नवीन भविष्यवाणी ? दसऱ्याच्या दिवशी सूर्या सिद्धार्थला तुळजाच्या पायाशी आणून टाकणार आहे आणि सूर्यादादाच्या हस्ते रावण दहन होणार आहे.*
तेव्हा बघायला विसरू नका अनेक घडामोडींनी नटलेला 'लाखात एक आमचा दादा' चा हा रोमांचक आठवडा दररोज रात्री ८:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.