*मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच, कॉर्डेलिया क्रूझवर झालं 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचं शूट !*
September 28, 2024
0
*मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच, कॉर्डेलिया क्रूझवर झालं 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचं शूट !*
*झी मराठी* नेहमीच आपलं वेगळेपण जपून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. आत्ता पर्यंत आपण पाहिलं आहे मालिकांचं शूट कुठच्या तरी समुद्र किनाऱ्यावर, हॉटेलमध्ये, किंवा कुठच्याही डेस्टिनेशनवर झालं आहे. पण या वेळी चक्क हे शूट समुद्राच्या मध्यभागी झालं आहे आणि हे सगळं घडलं आहे आलिशान ‘कॉर्डेलिया क्रूझवर’. *'नवरी मिळे हिटलरला' मराठी टेलिव्हिजनची पहिली मालिका ठरली आहे ज्या मालिकेचं शूट क्रूझवर झालं आहे.* वर मोकळं आकाश, पौर्णिमेचा चंद्र, थंडगार वारा आणि खाली निळाशार अथांग समुद्र ह्या रोमँटिक वातावरणात प्रेक्षकांची आवडती जोडी एजे आणि लीला कॉर्डेलिया क्रूझवर होती. लीला तिच्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची गोष्ट एजे ला या क्रूझवर सांगणार आहे. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतीळ खूप महत्वाच्या टप्प्याचं चित्रीकरण या क्रूझवर पार पडलं. अथांग समुद्राला साक्षी ठेऊन लीला ने एजेला या क्रूझवर प्रपोज केलंय. पण कहाणी मे ट्विस्ट है, लीलाच्या तीन सुना तिचं हे प्रपोजल हाणून पडण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा भाग टीव्ही स्क्रीनवर पाहण्याचा अनुभव प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय असणार आहे. या सहलीसाठी क्रूजवर फक्त एजे-लीला नाही तर संपूर्ण जहागीरदार कुटुंब पोहोचलं आहे. दोन दिवसांच्या शूटिंगमध्ये, कलाकार आणि टीमने अनेक आव्हानांचा सामना केला, पण त्यांनी प्रेक्षकांना अद्भुत अनुभव मिळावा यात कुठेच कमतरता ठेवली नाही.
*वल्लरी विराजने आपला अनुभव व्यक्त करताना सांगितलं* "मी पहिल्यादांच क्रूजचा अनुभव घेतला आणि क्रूजवर शूटिंगचा अनुभव तर खूपच कमाल होता. आम्ही एजे-लीलाने एक सीन शूट केला जिथे लीला एजे ला प्रपोज करते. क्रूझवर शूटिंग केल्याने यामध्ये एक विशेषता जोडली गेली आहे. शूटिंग व्यतिरिक्त संपूर्ण टीमने खूप मज्जा केली आणि जितकं एक्सप्लोर करता आले तितकं केले. आशा आहे की जितकी मज्जा आम्हाला आली हा सीन शूट करताना तितकाच आनंद प्रेक्षकांनाही लवकरच मिळेल."
*झी मराठीने पारंपरिक टेलिव्हिजन निर्मितीच्या सीमांना ओलांडून आणखीन एक नवीन उपक्रम करून प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज आणले आहे.* हा विशेष भाग प्रेक्षकांना लवकरच पाहता येणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका 'नवरी मिले हिटलरला' रात्री १०:०० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.