*भक्तांच्या हाकेला धावून येणार,अष्टभुजा 'आई तुळजाभवानी' प्रकटणार*
September 02, 2024
0
*भक्तांच्या हाकेला धावून येणार,अष्टभुजा 'आई तुळजाभवानी' प्रकटणार*
आई तुळजाभवानीचा उदो उदो... कलर्स मराठी वाहिनीवर 'आई तुळजाभवानी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भक्तांच्या हाकेला धावून येणार, दुर्जनांच्या नाशासाठी अष्टभुजा 'आई तुळजाभवानी' प्रकटणार. 'आई तुळजाभवानी' मालिकेचा प्रोमो टीझर आज रात्री 9.25 वाजता 'कलर्म मराठी'वर प्रदर्शित झाला आहे. ‘आई तुळजाभवानी'च्या रुपात कोण दिसणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. अवघ्या महाराष्ट्राची 'कुलस्वामिनी' अर्थात 'आई तुळजाभवानी' लवकरच प्रेक्षकांना आपल्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर पाहायला मिळणार आहे.