*रजनीकांतचा ब्लॉकबस्टर 'जेलर' मराठीत: सन मराठीवर १५ सप्टेंबरला प्रीमियर*
September 10, 2024
0
*रजनीकांतचा ब्लॉकबस्टर 'जेलर' मराठीत: सन मराठीवर १५ सप्टेंबरला प्रीमियर*
सन मराठी सादर करीत आहे सुपरस्टार रजनीकांत अभिनीत ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जेलर’ चा बहुप्रतीक्षित मराठी प्रीमियर! रविवार, १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता. रजनीकांत, जॅकी श्रॉफ, मोहनलाल आणि तमन्ना यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या दमदार अभिनयाचा अनुभव मराठी भाषेत घेण्यासाठी तयार रहा!
<89_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7~2.jpg"/>
'जेलर' एक अॅक्शन चित्रपट आहे, ज्यात मुथुवेल पांडियनची भूमिका रजनीकांत साकारत आहे, जो एक निवृत्त तुरुंग अधिकारी आहे. आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी तो पुन्हा गुन्हेगारी जगात उतरतो. एका धोकादायक सिंडिकेटमध्ये शिरकाव करताना, मुथुवेलच्या न्यायाच्या निर्धाराची आणि त्याच्या अफलातून कौशल्याची एक अद्भुत कहाणी उलगडते. सूड आणि निष्ठेच्या या रोमांचकारी प्रवासात आपल्याला उच्च दर्जाचा अॅक्शन आणि थ्रिलर अनुभवायला मिळणार आहे.
आता, हा चित्रपट मराठी भाषेत सादर होत आहे, ज्यामुळे मराठी प्रेक्षकांना ही धमाकेदार कथा अधिक जवळून अनुभवता येईल.
*ह्या धमाकेदार चित्रपटाचा प्रीमियर चुकवू नका! आपल्या कॅलेंडरमध्ये १५ सप्टेंबरची तारीख नोंद करा आणि रविवारी सायंकाळी ७:०० वाजता सन मराठीवर 'जेलर' चा मराठी वर्ल्ड प्रीमियर पाहायला विसरू नका!*