निखिल अडवाणी यांनी शर्वरीचे कौतुक केले,
September 27, 2024
0
निखिल अडवाणी यांनी शर्वरीचे कौतुक केले, म्हणाले- "शर्वरी मध्ये एका पिढीत एकदा होणारी अभिनेत्री होण्याची क्षमता आहे"
प्रसिद्ध चित्रपट निर्माता, पटकथा लेखक आणि निर्माता निखिल अडवाणी, ज्यांना त्यांच्या दूरदर्शी दिग्दर्शन आणि प्रतिभेला ओळखण्याच्या कौशल्यासाठी ओळखले जाते, त्यांनी अलीकडेच तरुण आणि गतिशील अभिनेत्री शर्वरीचे कौतुक केले आहे, ज्यांनी त्यांच्या नवीनतम चित्रपट 'वेदा़' मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. दोन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीमध्ये निखिल अडवाणी यांनी बॉलिवूडमध्ये आपली ठळक छाप पाडली आहे. शर्वरी , तिने कमी कालावधीतच बॉलिवूडमधील सर्वात आश्वासक नव्या चेहऱ्यांपैकी एक म्हणून स्थान मिळवले आहे, तिच्या बहुपक्षीय अभिनय, समर्पण आणि पडद्यावरच्या प्रभावी उपस्थितीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शर्वरी बद्दल बोलताना निखिल अडवाणी म्हणाले, "मला नेहमीच असे वाटत आले आहे की शर्वरी मध्ये एका पिढीत एकदा होणारी अभिनेत्री होण्याची क्षमता आहे. तिची अभिनयासाठी असलेल्या निष्ठा, आवड आणि कामगिरीसाठी असलेली तीव्रता पाहून मी थक्क झालो. इतक्या कमी वयात तुमच्यात हे गुण दिसून येणे दुर्मीळ आहे. हे स्पष्टपणे दाखवते की शर्वरी आपल्या कारकिर्दीत ठसा उमटवू इच्छित आहे आणि ती पडद्यावर उत्तम कामगिरी करण्यासाठी सर्वस्व देत आहे, कारण इंडस्ट्रीत तिच्यासाठी हेच तीच ओळखपत्र आहे. ती या इंडस्ट्रीतील कोणालाही ओळखत नाही, त्यामुळे तिच्या अभिनयामुळेच तिच्यासाठी इथे दरवाजे उघडतील, आणि ती नेमके तेच करत आहे."
'वेदा़' मधील शर्वरी च्या उत्कृष्ट कामगिरीवर चर्चा करताना आणि तिच्या प्रवासाचा मागोवा घेत निखिल अडवाणी म्हणाले, "इतक्या कमी वेळात शर्वरी एक अशी अभिनेत्री बनली आहे जीच्या कडे लक्ष दिले पाहिजे आणि यामुळे मला खूप आनंद होतो. मला वाटते, तिच्या वयातील कोणीही वेदा़ मध्ये तितका दमदार अभिनय करू शकला नसता. तिचा प्रवास पुढे कसा उलगडतो हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे आणि एक मार्गदर्शक, दिग्दर्शक म्हणून, ज्यांनी तिच्यासोबत काम केले आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो."
शर्वरी लवकरच आलिया भट्टसोबत 'अल्फा'मध्ये दिसणार आहे. 'अल्फा' शर्वरी च्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, जिथे ती शाहरुख खान, सलमान खान, ह्रितिक रोशन, एनटीआर ज्युनिअर, दीपिका पादुकोण, कॅटरिना कैफ आणि कियारा अडवाणी सारख्या सुपरस्टार्ससोबत स्पाई यूनिवर्स मध्ये दिसणार आहे.