*अरिया मोदी आणि अयान झुबेर यांचे ‘टीएमओ’ हे पंजाबी-इंग्रजी गाणे प्रदर्शित*
September 26, 2024
0
*अरिया मोदी आणि अयान झुबेर यांचे ‘टीएमओ’ हे पंजाबी-इंग्रजी गाणे प्रदर्शित*
पंजाबी पॉप संगीताच्या लोकप्रिय लाटेत आणखी एक नवेकोरे पंजाबी आणि इंग्रजी भाषेतील मिक्स गाणे सध्या प्रेक्षकांचे मन जिंकते आहे. ‘टीएमओ – ते आमो, आय लव्ह यू’ असे बोल असलेले गाणे अरिया मोदी आणि मधुर धीर यांनी गायले असून मॉडेल, अभिनेता अयान झुबेर आणि खुद्द अरिया यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. पंजाबी पॉप, इंडी पॉप आणि रेगेटन संगीतशैली अशा मिश्र शैलीतील हे गाणे पियूष जैन यांनी दिग्दर्शित केले आहे. प्रसिध्द गायक दिलजीत दोसान आणि सिया, निक जोनास आणि किंग अशा भिन्न संगीतशैलीतील गायकजोड्यांनी यशस्वी केलेल्या संगीत प्रकारावरून प्रेरित होऊन या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. मुंम्बाहटन बीट्स आणि शहरी पंजाबी ठेका यांचे अफलातून मिश्रण असलेले हे गाणे सध्याच्या लोकप्रिय पंजाबी पॉप संगीतप्रवाहातील एक ताजेतवाने आणि जगभरातील अबालवृध्द संगीतप्रेमींना आव़डेल असे आहे.
गोव्यातील निसर्गरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात दोन वेगवेगळ्या देशातील अनोळख्या व्यक्तींची पहिल्याच भेटीत प्रेमात पडण्याची गोष्ट पाहायला मिळते. या म्युझिक व्हिडिओमध्ये दिग्दर्शक पियुष जैन यांनी या रोमँटिक गाण्यातील भाव आणि ताल खूप सुंदररित्या चित्रित केला आहे. या गाण्याच्या निमित्ताने अरिया मोदी या १७ वर्षीय इंडो – अमेरिकन गायिकेने पुनरागमन केले असून तिचं ‘टॉक अबाऊट इट’ हे गाणंही प्रचंड लोकप्रिय आहे. मायकेल जॅक्सन, स्टीव्ही वंडर, लायोनेल रिची आणि रे चार्ल्स यांसारख्या प्रतिभावंत गायक कलाकारांना प्रशिक्षण देणारे व्होकल कोच सेठ रिग्ज यांच्याकडून अरियाने आवाजाचे प्रशिक्षण घेतले आहे.
तर या गाण्यात अरियाच्या साथीने गाणे गायलेले मधुर धीर हेही त्यांच्या बेपर्वा, रेड प्रादा अशा लोकप्रिय गाण्यांसाठी ओळखले जातात. आपली पंजाबी भाषा, ठेका आणि बहुभाषिक संगीताच्या फ्युजन संगीतासाठी मधुर प्रसिध्द आहेत. त्यांच्या दर्जेदार पंजाबी संगीतगायनाची अरियाच्या इंग्रजी गाण्याला अप्रतिम जोड मिळाल्याने गाण्याचा भावार्थ अधिक गहिरा झाला आहे. हे गाणे ज्याच्यावर चित्रित झाले आहे तो मॉडेल, अभिनेता अयान झुबेर हा लोकप्रिय मालिका, वेब मालिका आणि जाहिरातींचा भाग राहिलेला आहे. त्याच्या चमकदार अभिनय, स्टाईल याचे उत्तम प्रतिबिंब गाण्यात उतरले आहे. जन्नत झुबेर याचा भाऊ अयानने या व्हिडिओत त्याची बुध्दीमत्ता आणि सौंदर्य दोन्हीची चुणूक पडद्यावर पाहायला मिळते.
पंजाबी पॉप, भारतीय आणि रेगेटन संगीत शैलीचे फ्युजन साधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न यात करण्यात आला असून जेणेकरून हे गाणे जगभरातील श्रोत्यांना आवडू शकेल. मुंम्बाहटन संगीत शैलीतील घटक आणि रेगेटन संगीतातील बीट्स यामुळे आधुनिक लोकांना ठेका धरायला लावेल, असा ताल या गाण्याला लाभला आहे. शिवाय, पंजाबी भाषेचा गोडवा त्यात असल्याने ते गाणे अधिक आपलेसे वाटते.
अरिया मोदी आणि मधुर धीर यांनी गायलेले हे गाणे अयान झुबेर आणि अरिया यांच्यावर चित्रित करण्यात आले असून पियूष जैन यांनी दिग्दर्शित केले आहे. साहिल शर्मा यांचे संगीत दिग्दर्शन असलेले ‘टीएमओ – ते आमो, आय लव्ह यू’ हे गाणे एकप्रकारे प्रेमाचे सेलिब्रेशन आहे. दोन संस्कृतींचा मिलाफ आणि गाण्यातून गोष्ट उलगडण्याची जादू या गाण्यातून साधली गेली आहे. तुम्हालाही ठेका धरायला लावेल असे हे गाणे सगळ्या प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध झाले आहे.