Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अक्षय म्हात्रेच्या गणेशोत्सवाच्या आठवणी*

*अक्षय म्हात्रेच्या गणेशोत्सवाच्या आठवणी* *'पुन्हा कर्तव्य आहे' च्या सेटवर ही गणपती आगमन होणार.* महाराष्ट्र मध्ये काही दिवसातच गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु होणार आहे. कलाकार असो किंवा सर्वसामान्य माणूस सर्वच सुट्टी घेऊन बप्पाची सेवा करतात. 'पुन्हा कर्तव्य आहे' मधला तुमचा लाडका आकाश म्हणजेच अक्षय म्हात्रेने आपली उत्सुकता व्यक्त करताना सांगितले. *"बाप्पाची स्थापना आधी आमच्या गावी अलीबागला व्हायची आणि आम्ही दरवर्षी गावी जायचो. पण जसं आजी-आजोबांचं वय होत गेले तसं गावी प्रवास करणं तिथे जाऊन तयारी कारण थोडं कठीण होत गेले. कोविडच्या काळात आम्ही ठरवले की गणपती बाप्पाला मुंबईच्या घरी स्थापित करायचं. तेव्हा पासून आम्ही गणेश स्थापना आमच्या नेरुळ च्या घरी करायला सुरुवात सुरवात केली. हे आमचं ४ वर्ष आहे. हे वर्ष खास आहे कारण लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव आहे.
मी तर खूप खुश आणि उत्साही आहेच पण माझी बायको माझ्यापेक्षाही उत्सुक आहे. तिची तयारी सुरु आहे आमची रोज चर्चा होते सजावटीवर, नेवेद्य काय ठेवायचा यावर आणि तिने मला आरती शिकवायला सांगितली आहे. तर खूप उत्साहाचा माहोल आहे घरी. आई-बाबा जाऊन बाप्पाची मूर्ती बुक करून आले आहेत. आमच्या घरी बाप्पा लालबागच्या गणपतीच्या रूपात येतात. लहानच मूर्ती असते पण रूप त्याच लालबागच्या राजाचे असतं. मला गहेशोत्सवात जी गोष्ट आवडते ती म्हणजे सगळा मित्र परिवार एकत्र येतो. आमच्या घरी दीड दिवस गणपती असतो आणि त्या दिवसात झोप हा प्रकारचं नसतो. दिवसभर कोणतरी दर्शन करायला येतच असत. घर एकदम गजबजलेलं असत. पाहुण्यांसोबत गप्पा-टप्पा, खेळ- खेळले जातात, गाणी गायली जातात. मला मोदक खायला प्रचंड आवडतात तूप घालून तर त्याची मज्जा वेगळीच आहे. पूर्ण धमाल वातावरण असत घरी. आमच्या 'पुन्हा कर्तव्य आहे' च्या सेटवर म्हणजे मालिकेमध्ये ही गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे खूप काही घडणार आहे या दरम्यान मालिकेत. सेटवर पण उत्साहाचा माहोल असणार आहे. तर ती ही वेगळी मज्जा असणार आहे."* तेव्हा विसरू नका 'पुन्हा कर्तव्य आहे' सोम- शुक्र रात्री ९: ३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.