Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*सातव्या मुलीची सातवी मुलगीमधे येतंय ७ वर्षानंतरचं कथानक*

*सातव्या मुलीची सातवी मुलगीमधे येतंय ७ वर्षानंतरचं कथानक* *७ वर्षांनंतर आईपणाची कथा* शतग्रीवच्या वार करण्याने इंद्राणी कोमात जाते आणि शतग्रीव रीमाऐवजी ईशाला...जे दैवी बाळ आहे त्याला घेऊन जातो ज्याच्या तावडीतून नेत्रा देवीआईच्यता मदतीने सोडवते- शतग्रीवला मैथिलीचं शरीर सोडावं लागलं आणि नेत्राला तिची मुलगी ईशा परत मिळाली त्याचवेळी त्रिनयना देवीने मैथिलीला आधार देण्यासाठी नेत्राला आदेश दिला आणि नेत्रा देवीने सांगितल्याप्रमाणे मैथिलीला पुन्हा घरात घेऊन येते परंतु, राजाध्यक्ष कुटुंब काही केल्या मैथिलीला स्वीकारण्यात कोणतंच स्वारस्य दाखवत नाहीत हे समजून नेत्राने त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न केला पण कोणीच मैथिलीला आपलंस करणार नाही हे लक्षात येतं. मैथिली नेत्राची खटपट पाहून शेवटी नेत्राचा विचार करून घर सोडते. तेंव्हाच पुरलेल्या बंटीमामाच्या कानात शतग्रीव प्रवेश करत मैथिलीची भेट घेतो. मैथिली मात्र तिथपासून दूर पळते आणि राजाध्यक्ष कुटुंबात परतते. त्यावेळी एक आकाशवाणी होते कि... शतग्रीव पुन्हा येणार... ही सृष्टी उद्वस्त करणार आणि कथानक ७ वर्ष पुढे जातं.
७ वर्षांनंतर ईशा रीमा मोठ्या झालेल्या पण राजाध्यक्ष कुटुंबात नेत्राला वाटणारं सुख हे खरंतर वरवरचा देखावा असून घर दुभंगलं जातं. नेत्रा मैथिलीचं सगळं करण्यात आणि मुलींच्या संगोपनात गर्क होते. राजाध्यक्ष कुटुंबातले सदस्य नेत्राच्या विचारांशी सहमत नसल्याने विरुद्ध होतात अश्यातच कोमात असलेली इंद्राणी...जी मरणाच्या दारात आहे...तिला ईशाच्या स्पर्शाने...पुन्हा जीवनदान मिळतं...व एक नवा अध्याय सुरु होतो. ईशाच्या या शक्तींनी व इंद्राणीने घरात येऊन नेत्राने मैथिलीला घरात आणण्याच्या विचाराचा अस्वीकार करत...घरातल्या स्त्रियांचा एक आईपणाचा संघर्ष सुरु होतो... या आईपणाच्या प्रवासात नेत्रा कशी बांधून ठेवेल आपल्या कुटुंबाला आणि खऱ्या अर्थी राजध्यक्ष कुटुंबात सुख नांदेल का? अश्या मार्गावर ७ वर्षानंतरचं कथानक आधारित असेल...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.