Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*त्रिनयना देवीच्या मदतीने नेत्राच्या हातून होणार विरोचकाचा वध !*

*त्रिनयना देवीच्या मदतीने नेत्राच्या हातून होणार विरोचकाचा वध !* नेत्राच्या नेत्रा व राजाध्यक्ष कुटुंबाला त्रिनयना देवीचा आशीर्वाद कळतो तो म्हणजे नेत्रा पाच नाही तर सात महिन्यांची गरोदर आहे. नेत्राला जुळी मुलं होणार असल्याची बातमी कळून सगळ्यांच्याच आनंदाला पारावार उरलेला नाही. राजाध्यक्ष कुटुंब विरोचकाला या जुळ्या मुलांची कुठल्याच प्रकारे माहिती न देण्याचं ठरवतात. देवीनेच विरोचकाचा वध रचला आहे या विचाराने जल्लोषात नेत्राचं डोहाळेजेवण साजरं होतं आणि नेत्राला प्रसूतीकळा सुरु होतात.
रुपालीही त्याचसाठी सज्ज झालेली असताना अद्वैत नेत्राला रुपालीच्या तावडीतून वाचवत हॉस्पिटलला घेऊन जायला निघतो. इंद्राणी व राजाध्यक्ष कुटुंब रुपालीला घरात थोपवून धरतात. अद्वैत नेत्राला हॉस्पिटलला घेऊन चाललेला असतानाच गाडी बिघडते. उपाय म्हणून अद्वैत हातगाडीवरून नेत्राला घेऊन जात असताना त्या हातगाडीचं चाक निखळतं आणि तेव्हाच नेत्राचा जीव वाचवायला एक हात येऊन ती हातगाडी धरतं आणि दिसतं की नेत्राला घेऊन जाणारी... अद्वैत च्या मदतीला धावून आलेली डॉक्टरचा वेश धारण केलेली त्रिनयना देवी आहे... ती त्रिनयना देवीच्या मंदिरालाच हॉस्पिटल म्हणून सांगत नेत्राला मंदिरात घेऊन जाते. *त्रिनयना देवीच्या मंदिरात एक दिव्य प्रकाशझोत पसरतो आणि नेत्रा २ बाळांची आई होते. देवी तिच्या मूर्त रूपात दर्शन देत नेत्राच्या हाती कट्यार देते. तिची पूर्वसूचना (Premonition) मिळण्याची जी ताकद आहे ती विरोचक वधासोबतच नष्ट होईल असं सांगते. नेत्रा विरोचकाचा वध करते. वध होताच त्रिनयना देवीवर रक्ताचा अभिषेक होतो परंतु त्या रक्ताचाच एक थेंब प्रवाही दिसतो. काय असेल या मागचं रहस्य? कि आहे कोणत्या नव्या संकटाची चाहूल?*
तेव्हा पाहायला विसरू नका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ रोज रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.