*अंकिता राऊत आणि आयुष संजीव याचं 'नाखवा वल्हव होरी' हे कोळी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला*
August 09, 2024
0
*अंकिता राऊत आणि आयुष संजीव याचं 'नाखवा वल्हव होरी' हे कोळी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला*
  *गायिका वैशाली माडे हिचं 'नाखवा वल्हव होरी' गाणं भेटीला* 
 *'नाखवा वल्हव होरी' या गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण*
 *नाखवा वल्हव होरी' हे कोळी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, नक्की पहा* 
 *प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला आलयं  'नाखवा वल्हव होरी' गाणं* 
 *प्रवीण कोळी या युट्युब चॅनलवर पाहता येणार 'नाखवा वल्हव होरी' गाणं* 
कोलीवुड प्रोडक्शन निर्मित'नाखवा वल्हव होरी' हे कोळी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रसिद्ध गायिका वैशाली माडे आणि ध्रुवन मूर्ती यांनी हे गाणं गायलं आहे. हे गाणं रसिक प्रेक्षकांना प्रवीण कोळी या युट्युब चॅनलवर पाहता येणार आहे.  नुकतचं या गाण्याच्या पोस्टरचे अनावरण प्रसिद्ध फुड ब्लॉगर  नलिनी मुंबईकर यांच्या हस्ते झाले.  
या गाण्याद्वारे अंकिता राऊत आणि आयुष संजीव हे मुख्य कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून नलिनी मुंबईकर लाभल्या आहेत. नृत्य दिग्दर्शकाची धुरा सतीश आणि कपिल यांनी सांभाळली आहे.संगीत आणि गीतरचना प्रवीण कोळी, योगिता कोळी यांची आहे.
गाण्याबद्दल वैशाली माडे आणि ध्रुवन मूर्ती म्हणाले, ब-याच काळानंतर हे कोळी गाणं प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे त्यामुळे आम्ही फार उत्सुक आहोत. कोळी गीताला प्रेक्षकांची पसंती कायमच मिळाली आहे. त्यामुळे आमच्या 'नाखवा वल्हव होरी'या गाण्यालाही प्रेक्षक भरभरुन प्रेम देतील अशी आशा आहे.    
वैशाली माडे हिने मराठी चित्रपटसृष्टीबरोबर हिंदी चित्रपट सृष्टीही गाजवली आहे.तिची 'पिंगा ग पोरी पिंगा', 'फितुरी' ही गाणी तुफान गाजली आहेत. तर, ध्रुवन मूर्ती याची 'नारलानं पाणी', 'देव पावलाय' ही गाणी गाजली आहेत.




 
 
 
