*नेत्राच्या आयुष्यात शतग्रीवची एन्ट्री ?*
August 17, 2024
0
*नेत्राच्या आयुष्यात शतग्रीवची एन्ट्री ?*
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नेत्रानि विरोचकाचा वध करून आपल्या दोन्ही जुळ्या मुलींना सोबत आपल्या आयुष्यात पुढेच आयुष्य जगायची सुरवात करते. पण तिला जाणवू आणि दिसू लागत कि दोन्ही जुळ्या मुलींचे स्वभाव मात्र विरुद्ध आहेत. जिथे ईशा देवाशी निगडित असलेल्या गोष्टींना स्वीकारते पण रीमा हिला मात्र देवांच्या संदर्भातील एकही गोष्ट आवडत नाही. अशीच काही गोष्ट कोलकाता मधे घडते. जिथे एका उत्खननात शतग्रीव नामक असूराचा शिलालेख सापडतो. त्या शिलालेखाचं वाचन करताच एक शक्ती जागी होते आणि ती शक्ती पश्चिम बंगालच्या दिशेने प्रवास करताना दिसते. डॉ. मैथिली सेनगुप्ता म्हणून एका डॉक्टरच्या कानात ती किडारुपी शक्ती शिरते. मैथिली सेनगुप्ताचं वागणं बदलून जातं आणि एकाक्षणी मैथिलीमधे शिरलेली शक्ती रूप घेते शतग्रिवचं आणि नवा राक्षस जागा होतो. एक साधी सरळ स्वभावाची मैथीली सेनगुप्ता शतग्रीव बनते व तिच्या सासूचा खून करत महाराष्ट्रच्या दिशेने निघते. काय लिहलंय मैथिली सेनगुप्ता आणि नेत्राच्या नशिबात. नेत्राची मुलगी रीमा नेत्राच्या आयुष्यात काय बदल घडवेल? *बघायला विसरू नका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी २.०' दररोज १०:३० वा. फक्त झी मराठी वाहिनी वर*