Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कॉन्स्टेबल मंजू' मध्ये दिसणार दहीहंडीवर सूडाची छाया

*'कॉन्स्टेबल मंजू' मध्ये दहीहंडी ड्रामा: मंजूच्या शौर्याने तात्या साहेबांच्या उत्सवात झाला गोंधळ!*
*तात्या साहेबांच्या दहीहंडीने घेतले अनपेक्षित वळण: मंजूच्या धाडसाने प्रेक्षकांना केले थक्क!* *'कॉन्स्टेबल मंजू' मध्ये दिसणार दहीहंडीवर सूडाची छाया मंजूच्या निस्वार्थ कृतीने तात्यांचा जीव वाचवला, थरारक प्रसंगात नाट्यमय वळण!*
सन मराठीची लोकप्रिय मालिका 'कॉन्स्टेबल मंजू' मध्ये रंगणार दहीहंडीचा सोहळा! ह्या दहीहंडीचा विशेष भाग प्रेक्षकांसाठी एक रोमांचक असणार आहे ज्यात मंजू, जी साधारणपणे तिच्या नेभळट स्वभावासाठी ओळखली जाते, ती पहिल्यांदाच गुंडांना सामोरे जाते.हा संपूर्ण भाग बाहेर शूट केला गेला आहे. या तुफानी भागात एका खऱ्या दही हंडी गटाचा समावेश असून ज्यामध्ये सत्याही हंडीच्या थरावर चढून हंडी फोडतो. इतक्यात मंजूवर हल्ला होतो.
हा धक्कादायक प्रसंग प्रेक्षकांना नक्कीच भावुक करणार आहे, जो या कथेतल्या खोल नात्यांचे आणि तीव्र नाट्याचे प्रदर्शन करून देणार आहे. अगदी आनंदाने भरलेला दहीहंडीचा उत्सव, हा एका क्षणात गंभीर होतो.या विशेष भागात असणारा आशय प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. आता मंजू जगणार की मरणार असा पेच निर्माण होतो *दही हंडीचा उत्सवात नक्की काय होतं ते पाहण्यासाठी 'कॉन्स्टेबल मंजू - गोपाळकाला विशेष' २६ ते ३१ ऑगस्ट संध्याकाळी ८:०० वाजता नक्की पाहा फक्त सन मराठीवर!*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.