*अधिपतीचा राग अक्षरा आणि त्याच्या नात्यात नवीन समस्या निर्माण करेल का?*
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत दुर्गेश्वरी अक्षराला इजा करण्याचा प्रयत्न करते, पण सुदैवाने अक्षरा त्यातून बचावते आणि संपूर्ण प्लान दुर्गेश्वरीवर उलटतो. अक्षरा आणि अधिपती हनीमून वरून कोल्हापुरात परातलेत. घरात आल्यावर अधिपतीला भुवनेश्वरीला घरातून हाकलून दिल्याची घटना कळते. अधिपती ते ऐकून अत्यंत चिडतो. हेच कारण की अधिपती आणि अक्षरा हनिमूनला निघाले असताना चारुहास अक्षराला कॉल करतो आणि तिला सांगतो की तिने कोणत्याही परिस्थितीत अधिपतीशी भुवनेश्वरीला फोनवर बोलू देऊ नये. तो तिला त्याचा कॉल लॉग डिलीट करण्याची सूचना करतो. चारुहास तिला एवढेच सांगतो की ते हनिमूनहून परत येईपर्यंत तिने अधिपतीला भुवनेश्वरीशी संपर्क करू नये. ह्या सगळ्या संवादाच्या मागचं सत्य अक्षराला कळत. अधिपती आणि चारुहास यांच्यात मोठा वाद होतो.
चारुहासने भुवनेश्वरीला घरातून हाकलून देण्याची योजना आखल्याचा आणि योजनेचा एक भाग म्हणून जाणूनबुजून त्याला आणि अक्षराला त्यांच्या हनीमूनला पाठवल्याचा आरोप अधिपती करतो. अधिपती आणि अक्षरा यांच्यातही मोठी झुंज आहे. अधिपती भुवनेश्वरीचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो आणि पोलिस तक्रार ही दाखल करतो. *अधिपती भुवनेश्वरीचा शोध घेऊ शकेल का? दुर्गेश्वरीचा कोणता प्लान तिच्यावरच उलटणार ? अधिपती-अक्षरा मध्ये चारुहासमुळे गैरसमज निर्माण होणार का? यासाठी पाहायला विसरू नका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' दररोज रात्री ८:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*