Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अवयवदाननाची महती सांगणारा "८ दोन ७५" : फक्त इच्छाशक्ती हवी आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर*

*अवयवदाननाची महती सांगणारा "८ दोन ७५" : फक्त इच्छाशक्ती हवी आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर* *देहदानाचे महत्त्व सांगणारा "८ दोन ७५" : फक्त इच्छाशक्ती हवी आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर* *"८ दोन ७५" : फक्त इच्छाशक्ती हवी आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर* अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. "८ दोन ७५" म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. आता हा चित्रपट तुम्ही घरबसल्या अ‍ॅमेझॉन प्राइम वर पाहु शकता.
उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी - सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. वैभव जोशी यांनी गीतलेखन, अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत.  "८ दोन ७५" : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट देहदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे. देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीनं मांडण्यात आला आहे. त्याशिवाय वैद्यकीय शिक्षणावरही या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे उत्तम स्टारकास्ट असलेला, महत्त्वाचा विषय मनोरंजक पद्धतीनं मांडणारा "८ दोन ७५": फक्त इच्छाशक्ती हवी नक्की पहा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.