अर्जुनने, अप्पी-अमोल बरोबर राहायचा निर्णय केला जाहीर !
August 21, 2024
0
*अर्जुनने, अप्पी-अमोल बरोबर राहायचा निर्णय केला जाहीर !*
'अप्पी आमची कलेक्टर' मालिका रंजक वळण घेत आहे. अमोलच्या प्रयत्नानंमुळे अर्जुन-अप्पी एकत्र येत आहेत. अर्जुन आर्याला सोडून अप्पी आणि अमोलसोबत राहण्याचा निर्णय घेतो आणि आर्य सोबतचा साखरपुडा मोडतो. सर्वकुटुंब अर्जुनच्या निर्णयाने आनंद साजरा करत. तर रूपाली मनीला अप्पी आणि अर्जुनला वेगळे करण्याचा प्रयत्न करतेय. विनायक कौटुंबिक जमीन अमोलच्या नावे करतो आणि हे पाहून मनी कागदपत्रे चोरण्याची प्रयत्न करते. अर्जुन अमोलची चित्र पाहून आश्चर्यचकित होतो. कुटुंबाचे लक्ष विचलित करण्यासाठी मनी सगळ्यांना मंदिरात जाण्याचा सल्ला देतो.
मंदिरात अमोल आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो. घरात कोणी नाही हे पाहून मनी जमिनीची कागदपत्रे चोरटे. अप्पी आणि अर्जुनला मनी मावशीनेच हे सगळं घडवून आणल्याची खात्री पटते. अर्जुन आणि अप्पी तरीही मनी मावशीला जवळ ठेऊन , तिला धडा शिकवण्याची योजना आखतात . अप्पी-अर्जुनचा नवीन संसार कसा असेल? मनी मावशीला अप्पी आणि अर्जुन कसा धडा शिकवणार? हे सगळं जाणून घेण्यासाठी बघत राहा 'अप्पी आमची कलेक्टर' दररोज संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.