एजेच्या हॉटेल मध्ये लीला करणार वेटरची नौकरी !
August 28, 2024
0
*एजेच्या हॉटेल मध्ये लीला करणार वेटरची नौकरी !*
लीला एजेच्या आयुष्यात अनेक मनोरंजक किस्से घडताना दिसत आहेत. कधी ती किडनॅपच होते तर कधी तिला केक खाण्याची शिक्षा होते. पण लीला कशी संधीच सोन करते आणि लीलाची लीलागिरी पाहण्यात प्रेक्षकांना जास्त उत्सुकता असते. मालिकेत सध्या लीलाच्या घरच्यांना साळुंखेने पुन्हा त्रास द्यायला सुरूवात केली आहे. राखिपौर्णिमेच्या दिवशी साळुंखे घरात असताना एजे- लिलाच्या घरी पोहोचतो आणि तिथे एजेला साळुंखेकडून घेतलेल्या लोन बद्दल कळतं. एजे ते लोनचे पैसे भरायचं ठरवतो. पण लीला ऐनवेळी येते आणि नकार देते. रेवती एजेने तिचं रक्षण केलं म्हणून एजेंना राखी बांधण्याचं ठरवते.
एजे रेवतीला ओवाळणी म्हणून १८ लाखांचा चेक देतो. एजेचं हे वागणं एकीकडे लीलाला आवडत आहे पण दुसरीकडे तिचा स्वाभिमान ही दुखावला जात आहे. ती एजेचे पैसे त्यांना परत करण्याचं ठरवते आणि वाट्टेल ते काम करायला तयार होते. लीलाची जिद्द पाहून एजे तिला आपल्या हॉटेलमध्ये काम करण्याचा सल्ला देतो. एजे, लीलाला हॉटेलमध्ये वेटरच काम करायला सांगतो. *लीला, किती काळ एजेच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम टिकवू शकेल? एकत्र काम करत असताना एजे-लीलाच नातं एक नवीन दिशा घेईल का? यासाठी बघायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*