शर्वरी चं ‘मंडे मोटिवेशन’ - 7 महिन्यांच्या बॉक्सिंग तयारीचा प्रवास आणि असंख्य मसल पुल्सचा खुलासा!
August 21, 2024
0
शर्वरी चं ‘मंडे मोटिवेशन’ - 7 महिन्यांच्या बॉक्सिंग तयारीचा प्रवास आणि असंख्य मसल पुल्सचा खुलासा!
बॉलीवूडची उदयोन्मुख स्टार शर्वरी ला तिच्या अलीकडील ‘वेदा’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी खूप प्रशंसा मिळत आहे. चित्रपटाच्या रिलीज नंतर काहीच दिवसांनी शरवरीने सोशल मीडियावर एक तुफान व्हिडिओ शेअर केला, ज्यात तिने तिच्या बॉक्सिंगच्या तयारीचा प्रवास दाखवला आहे.
शर्वरी ने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिलं, "7 महिन्यांची बॉक्सिंग तयारी. आठवड्यातून 6 दिवस 2 तास रोज. असंख्य मसल पुल्स. रिहॅब. पुन्हा परत कामावर... 👊🏻
कोणताही शॉर्टकट नाही.
नजरा लक्षावर 🥊
#MondayMotivation #Vedaa"
https://www.instagram.com/reel/C-2u7OGtFYl/?igsh=MXRxdGUwZ2lucnVpcQ==
शर्वरी ची मेहनत आणि समर्पण हे तिच्या करिअरमधील एक महत्वाचा टप्पा आहे, कारण ती ‘अल्फा’ या आगामी चित्रपटाचीही तयारी करत आहे. या चित्रपटात ती आलिया भट्टसोबत दिसणार आहे. YRF च्या स्पाय युनिव्हर्सचा हा भाग असून, तो आपल्या दमदार ऍक्शन आणि कथेसाठी ओळखला जातो. शरवरीच करिअर वेगाने पुढे जात आहे, आणि ती भारताची पुढील मोठी ऍक्शन स्टार बनण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये.