*नेटफ्लिक्स आणि YRF चा 'महाराज' 22 देशांमध्ये ग्लोबल हिट, जुनैद म्हणतो, "हा सामूहिक विजय आहे!"*
July 03, 2024
0
*नेटफ्लिक्स आणि YRF चा 'महाराज' 22 देशांमध्ये ग्लोबल हिट, जुनैद म्हणतो, "हा सामूहिक विजय आहे!"*
सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांच्या दिग्दर्शनाखालील YRF एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्सच्या सहकार्याने निर्मित 'महाराज' चित्रपट 21 जून रोजी प्रदर्शित झाला आहे.
मुंबई -- : नेटफ्लिक्स आणि YRF एंटरटेनमेंटच्या सहकार्याने निर्मित 'महाराज' चित्रपट 22 देशांमध्ये ग्लोबल नॉन-इंग्लिश टॉप टेन यादीत झळकला आहे.
या चित्रपटात जुनैद खानने पदार्पण केले आहे, तर जयदीप अहलावत, शालिनी पांडे आणि शर्वरी (विशेष उपस्थिती) यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यातच 5.3 दशलक्ष न्यूज मिळवले आहेत.
जुनैद म्हणतो, "माझ्या पदार्पणासाठी लोकांनी दिलेल्या प्रेम, कौतुक आणि फीडबॅकसाठी मी आभारी आहे. मी माझे निर्माता YRF, माझे दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा, जयदीप सर, शर्वरी, शालिनी आणि सर्व कास्ट आणि क्रू सदस्यांचे अभिनंदन करतो. हा अमचा सामूहिक विजय आहे. आम्ही एक विशेष चित्रपट तयार केला आहे ज्याला नेटफ्लिक्सने जगभरात नेले आहे आणि हा चित्रपट सर्वत्र प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे."
या यशानंतर, 'महाराज' चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या नॉन-इंग्लिश टॉप टेन यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 1862 च्या महाराज लिबेल केसवर आधारित या चित्रपटाने आपल्या प्रभावी कथा आणि उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवले आहे, या अद्भुत सहकार्याची ताकद दाखवून दिली आहे.
'महाराज' नेटफ्लिक्सवर विशेषतः स्ट्रीमिंग होत आहे!