Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बाई गं' चित्रपटाचा धमाल ट्रेलर आऊट*

*५ जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा नवरा पूर्ण करू शकेल? नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' चित्रपटाचा धमाल ट्रेलर आऊट* नवरा बायकोचं नातं म्हणजे, दोघांसाठी संकट पण तूच आणि त्या संकटावरील इलाजही तूच, असच काही घडलय स्वप्नील जोशी सोबत। वर्तमान आयुष्यात तरी त्याला बायकोचं मन काही कळालं नाही, मागच्या ५ जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा तो कसा पूर्ण करतो आता हे येत्या १२ जुलै ला आपल्याला 'बाई गं' ह्या चित्रपटा द्वारे समजेल.
या भन्नाट चित्रपटाचा ट्रेलर आता रिलीझ झालाय ट्रेलर मध्ये आपण स्वप्नील ची तारेवरची कसरत पाहू शकतो। कॉमेडी आणि भावनेने भरपूर असा हा ट्रेलर असून यात शेवटी स्वप्नील ला बाईच्या मनाला समजायला बाई चं रूप घ्यावं लागतंय। आता या चित्रपटाचा शेवट नक्की काय असेल हे पाहणं रोमांचक ठरणार आहे। या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबत प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहे. "बाई गं" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' हा चित्रपट १२ जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.