Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"ऑरगॅनिक जेवण आणि मोराच्या आवाजांनी माझ्या दिवसाची सुरवात होते"- दिशा परदेशी

*"ऑरगॅनिक जेवण आणि मोराच्या आवाजांनी माझ्या दिवसाची सुरवात होते"- दिशा परदेशी*
सध्या सातारा वाई भागात अनेक मालिकांची शूटिंग सुरु आहेत. 'अप्पी आमची कलेक्टर', 'पारू' सारख्या मालिका सातारा मध्ये शूट होतं आहेत. तसेच नुकतीच पेक्षकांच्या भेटीस आलेली 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका वाई मध्ये शूट होतं आहे. या मालिकेची नायिका दिशा परदेशीने शूटिंगचा अनुभव व्यक्त केला. *"आम्ही सातारा, वाई भागात शूट करतोय. वाईच्या आधी एक छोटंसं गाव पडत मयुरेश्वर तिथे आमचा सेट आहे, आमचा वाडा आहे आणि आम्ही कलाकार ही इथेच आसपास राहत आहोत. इथे शूट करण्याची खासियत म्हणजे हे ठिकाण खूप निसर्गरम्य आहे जिथं पर्यंत नजर जाईल तिथं पर्यंत हिरवळच दिसतेय. त्यामुळे माझा पूर्ण दिवस एकदम सुखकारक जातो. इथे शहरासारखी रहदारी नाही, गाड्या कमी असल्यामुळे हँकिंगच प्रमाण कमी आहे. ह्याचमुळे मी तुळजाच पात्र खऱ्याअर्थाने जगत आहे.
सातारा मध्ये ही प्रचंड पाऊस पडतो फरक इतकाच की इथे मुंबई सारखं पाणी तुंबत नाही त्यामुळे शूटिंग मध्ये बाधा येत नाही आणि इथे पाऊसाची मनसोक्त मज्जा घेता येते.* *मुंबई मध्ये अवतीभवती मोठंमोठ्या इमारती दिसतात पण इथे हिरवगार निसर्ग अनुभवायला मिळतो आणि पावसात इकडच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. माझा जन्म एका छोट्या शहरातला आहे तिथेच माझं शालेय शिक्षण झाले आणि कॉलेज मुंबई मधलं रुईया कॉलेज. कामासाठी मी जगभर फिरते पण कधी गावात शूटिंग करायचा अनुभव नव्हता मिळाला. पण 'लाखात एक आमचा दादा' मालिकेमुळे मला ही संधी मिळाली.* *मी खरंच सांगेन फार टेन्शन आलं होत मला ? पण इथे आल्यावर माझं आयुष्य सॉर्ट आऊट झाले आहे. कितीदा असे झाले आहे की आऊटडोर शूटिंग लागलाय आणि तिथे फोनच नेटवर्क नाही हेच जर मी मुंबईत असताना झालं असत तर मी पॅनिक झाले असते. काम आणि मन दोन्ही प्रसन्नतेत सुरु आहे. शहरात ही गोष्ट कधीच अनुभवायला मिळाली नाही. इथेच एका घरात आम्ही जेवतो त्या मावशींची शेती आहे आणि त्या दररोज ताज्या भाज्या काढून आमच्यासाठी जेवण बनवतात. इतकं स्वादिष्ट जेवण मी आज पर्यंत कधीच खाल्ले नाही.* *एकदम ऑरगॅनिक आणि घरगुती जेवण मी शूटिंग वर खात आहे. अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे जितके मोर मी माझ्या पूर्ण आयुष्यात नसतील पाहिले तितके मी इथे ह्या गावात पहिले आहेत. चक्क रास्ता क्रॉस करत असताना इथे मोर दिसतात . माझ्या दिवसाची सुरवात मोराच्या आवाजानी होते. मला इथे गजर लावायची गरज लागत नाही. गावात शूटिंग करण्याच्या अनुभव बद्दल मी जितकं बोलीन तितकं कमीच आहे. झी मराठी आणि वज्र ची मी आयुष्यभर ऋणी राहीन. त्यांनी मला ही सुंदर संधी आणि अनुभव दिल्याबद्दल."* तेव्हा बघायला विसरू नका 'लाखात एक आमचा दादा' दररोज रात्री ८:३० वा फक्त झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.