Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तब्बल दोन वर्षानंतर अभिनेता विशाल निकमने केसाला लावली कात्री

तब्बल दोन वर्षानंतर अभिनेता विशाल निकमने केसाला लावली कात्री येड लागलं प्रेमाचं मालिकेत पाहायला मिळणार रायाचा नवा अंदाज स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’ला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. आजवर मालिकेत प्रेक्षकांनी रायाचं रांगडी रुप पाहिलं आहे. दाढी-मिश्या आणि केस वाढवून आपल्या मित्रांसोबत गावभर हिंडणाऱ्या रायाला आपण पाहिलंय. मात्र लवकरच रायाचा कायापालट होणार आहे. नव्या रुपातला राया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरवर फणसासारखा काटेरी आणि कठोर वाटत असला तरी राया प्रचंड प्रेमळ आहे. नव्या रुपासह रायाचा हाच प्रेमळ स्वभावही यापुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
विठुरायाचे आशीर्वाद घेत रायाच्या आयुष्यात नवे बदल होणार आहेत. मालिकेतलं हे अत्यंत महत्त्वाचं वळण आहे. रायाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमने तब्बल दोन वर्षांनंतर आपल्या केसांना कात्री लावली आहे. याविषयी सांगताना विशाल म्हणाला, कथानकाची गरज म्हणून जे काही करणं गरजेचं आहे ते करणं हे कलाकार म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. रायाचा लूक चेंज ही कथानकाची गरज होती. गेली दोन वर्ष एका सिनेमासाठी मी केस वाढवत होतो. योगायोगाने येड लागलं प्रेमाचं मालिकेसाठी माझी याच लूकमध्ये निवड झाली. दोन वर्षांनंतर मी स्वत:ला अश्या रुपात पहाणार आहे. मी माझा लूक नक्कीच मिस करेन. मला या रुपात पाहून माझ्या आईला सर्वाधिक आनंद होणार आहे. मला खात्री आहे रायाचा हा नवा अंदाज प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल. येड लागलं प्रेमाचं मालिकेतला रायाचा हा नवा अंदाज पाहायला विसरु नका सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.