Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*"सिलेंडर उचलायच्या सीनच्या वेळी मी आजारातून उठून आले होते" - पूर्वा कौशिक*

*"सिलेंडर उचलायच्या सीनच्या वेळी मी आजारातून उठून आले होते" - पूर्वा कौशिक* 'शिवा' मालिकेत शिवाचे कारनामे आणि कसोटी पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून वाट पाहत असतात आणि हल्लीच एक सीन झाला जिथे शिवा सिलेंडर उचलते. ह्या सीनला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हा सीन करण्यासाठी शिवा म्हणजेच पूर्वाची तारेवरची कसरत कशी झाली होती. पूर्वा कौशिकनि आपला अनुभव व्यक्त केला. *"ह्या सीनची गम्मत अशी की ज्या दिवशी शूटिंग झालं त्याच्या ३ दिवस आधी माझी तब्बेत प्रचंड बिघडली होती. त्या आधीच माझ्या कानावर आले होते की सिलेंडर उचलायचा एक सीन आहे. दिग्दर्शक सर आणि मी एकदम जोशात होतो की सिलेंडर उचलायचा आहे. पण जेव्हा मी आजारी पडले तेव्हा वाटलं की हे मला जमेल का कारण खूप अशक्तपणा आला होता. सरांनी प्रोत्साहन दिलं की डोक्यानी आणि मनानी शांत राहा सगळं बरोबर होईल.
हे सगळं होत असताना दुसरीकडे कळलं की सिलेंडर मिळू शकला नाही. अर्धा भरलेला सिलेंडर होता तो, मी थोडी घाबरले, तुम्हाला सोशल मीडिया वर मी टाकलेल्या विडिओ मध्ये दिसलेच असेल की दिग्दर्शक सर आणि पूर्ण टीम कशी माझी मदत करत आहेत, माझी काळजी घेत आहेत. हे सगळं घडून आलं पूर्ण टीममुळे, कारण तो पूर्ण एक सीन होता मी तो सिलेंडर उचलून पुढं पर्यंत आणून, घरा पर्यंत नेऊन तिथे लावते. शूट करताना ही मजा आली आणि ह्याच श्रेय मी मारुती सरांना देते. "* तेव्हा पाहायला विसरू नका 'शिवा' सोमवार ते शुक्रवार रात्री ९:०० वा. फक्त झी मराठी वर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.