Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्रवाहच्या " ठरलं तर मग. " मालिकेत ८ जुलैला येणार सर्वात मोठा ट्विस्ट

स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेत ८ जुलैला येणार सर्वात मोठा ट्विस्ट पूर्णा आजी सायलीचा नातसून म्हणून करणार स्वीकार!
स्टार प्रवाहची ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतने वाट पहातोय तो भावनिक क्षण ८ जुलैच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पूर्णा आजी सायलीला नातसून म्हणून स्वीकारणार आहे. मालिकेतलं हे अत्यंत महत्त्वाचं वळण आहे.
खरतर सायलीने आपल्या प्रेमळ आणि समंजस स्वभावाने सर्वांचच मन जिंकलं. सायलीच्या निरागस स्वभावाच्या अर्जुनही प्रेमात पडला. पूर्णाआजीचं मतपरिवर्तन व्हायला मात्र खूप वाट पहावी लागली. अनेक प्रसंगांमध्ये पूर्णाआजीला सायलीमध्ये तिच्या लाडक्या प्रतिमाचा भास व्हायचा. मात्र तरीही तिने सायलीला नातसुनेचा दर्जा कधीच दिला नाही. आता मात्र पूर्णा आजीला आपल्या चुकीची जाणीव झालीय. संपूर्ण कुटुंबासमोर सायलीची माफी मागून पूर्णाआजी घराची जबाबदारी सायलीवर सोपवणार आहे. मालिकेतला हा हळवा क्षण ८ जुलैच्या विशेष भागात पाहायला मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका ठरलं तर मग रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.