Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*'बिग बॅास'मध्ये कल्ला करायला येतोय, महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख*

*'बिग बॅास'मध्ये कल्ला करायला येतोय, महाराष्ट्राचा लाडका सुपर स्टार रितेश देशमुख* *आता मस्ती, दोस्तीची कमाल आणि अफलातून धमाल!!*
'बिग बॉस' म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर जगभरात बोलबाला असलेला मनोरंजनाचा बादशाह… छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम !!! 'कलर्स मराठी' आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली… आणि गेली दोन वर्षे रसिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या 'बिग बॅास' मराठीची प्रतीक्षा आता संपली आहे. नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या पर्वाची घोषणा होताच सोशल मीडियावर लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. कारण या सीझनचा होस्ट आहे, हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा … महाराष्ट्राचा लाडका सुपर स्टार रितेश देशमुख!! रितेशने आजवर आपल्या अभिनयाने चित्रपट रसिकांना 'वेड' लावलं आहे. पण आता टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला , 'बिग बॉस’ मराठीचा हा नवा सिझन गाजवायला , वाजवायला तो सज्ज झाला आहे. रितेशच्या येण्याने 'बिग बॉस'च्या घरात जबरदस्त कल्ला होणार आहे. एकंदरीतच आपल्या मराठमोळ्या रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार आहे, हे नक्की!
*रितेश भाऊची 'लयभारी' स्टाईल!* 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये तरूणांचा हार्ट थ्रॅाब रितेश देशमुख होस्ट असल्याने यावेळी खूप धमाल पहायला मिळणार आहे. रितेश असल्याने यावेळचा सीझन अधिक तरूण असणार आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये रितेशचा रूबाब अन् त्याची 'लय भारी' स्टाईल पाहायला मिळत आहे. तसेच त्याचा कमाल स्वॅगही अनुभवायला मिळत आहे. रितेशची 'बॉसी'गिरी पाहण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. 'बिग बॉस'मध्ये आतापर्यंत एका वेगळ्या पद्धतीचे खेळ, नियम आणि टास्क होते. पण आता रितेशच्या येण्याने नावीन्य येणार असल्याचं प्रोमोवरुन स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच तर रितेश भाऊ म्हणतोय,"आता मी आलोय... कल्ला तर होणारच...!!” 'बिग बॅास' हा शो प्रसिद्ध आहे तो, त्यातील अतर्क्य , अशक्य , अफलातून गोष्टींसाठी.. अतरंगी कलावंतांच्या सतरंगी करामतींसाठी!! या अशक्य गोष्टींनीच 'बिग बॅास'ला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. पण हा जितका मनोरंजक खेळ आहे , तितकाच तो एक जबरदस्त माईंड गेम आहे. असा हा रसिकांचा लाडका भव्यतम कार्यक्रम "बिग बॉस मराठी” चा नवा सीझन प्रेक्षकांना लवकरच कलर्स मराठी आणि Jiocinema वर पाहता येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.