Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मराठी टेलिव्हिजन पहिल्यांदाच येतेय भावा बहिणींच्या नात्यावर आधारीत मालिका !*

*मराठी टेलिव्हिजन पहिल्यांदाच येतेय भावा बहिणींच्या नात्यावर आधारीत मालिका !* *'लाखात एक आमचा दादा' मालिकेचं ग्रँड प्रीमियर* *मालिकाविश्वात पहिल्यांदाच दाखवला जाणार 'लाखात एक आमचा दादा' चा पूर्वरंग भाग !* तो येत आहे तुम्हा सर्वांच्या भेटीला! आईची माया लावणारा, स्वभावाने निरागस, करारी मर्द, करड्या शिस्तीचा मात्र बहिणींच्या सुखासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांची लग्न उत्तमोत्तम घरात लागावीत यासाठी दिवस रात्र जीवाचे रान करणारा 'लाखात एक आमचा दादा'. मोठ्या दिलाचा राजामाणूस ‘सूर्यादादा’ येत आहे ८ जुलै २०२४ रात्री ८:३० वा.
दादा येतोय म्हटल्यावर सेलेब्रेशन ग्रँड असणारच, दादाच आगमन झालं ते ढोल -ताश्याच्या गजरात. *नितीश चव्हाणने सूर्यदादाच्या भव्य ३० फीट प्रतिमेचं अनावरण त्याच्या लाडक्या बहिणींसोबत केलं आणि ह्या ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार झाले ते सातारकर* . ह्या भव्य क्षणांचे तुम्हीही साक्षीदार बनणार आहात. हे खास क्षण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ७ जुलैला रात्री ८.३० वा फक्त आपल्या झी मराठीवर. अश्याप्रकारे कोणत्याही मालिकेचं भव्य पूर्वरंग होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. मालिका विश्वात पहिल्यांदाच येत आहे बहिणींना आईच्या मायेनी वाढवणारा सूर्यादादा. बहिणींच्या लग्नाची त्याला चिंता पण विधीच आहे काही वेगळंच विधान. दादाच लग्न ठरवणार बहिणीचं भविष्य. पण सूर्याची लव्ह स्टोरी सोपी नाही कारण त्याच्या प्रेमाच्या मध्ये आहे जालिंदर. एकीकडे दुष्ट बाप आणि एकीकडे प्रेमळ सूर्यादादा. *जालिंदरच्या दमदार भूमिकेत दिसणार आहेत जेष्ठ अभिनेते ‘डॉ. गिरीश ओक’* . या मालिकेत ते खलनायकाची भूमिका साकारत आहेत. परिस्थितीने कितीही केली मात तरीही देवाची आहे दादाला साथ. या मालिकेच्या निमित्ताने ‘लागीर झालं जी’ नंतर ‘नितीश चव्हाण’ पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहे. तसेच ‘ *दिशा परदेशी’ देखील या मालिकेच्या निमित्ताने मराठी मालिकाविश्वात नायिकेच्या भूमिकेत पदार्पण करतेय* .
या मालिकेचं लेखन केलंय ‘स्वप्नील चव्हाण’ आणि ‘विशाल कदम’ यांनी तर मालिकेचे दिग्दर्शक आहेत ‘किरण दळवी’. ‘वज्र प्रोडक्शन’ या मालिकेची निर्मिती करणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका *'लाखात एक आमचा दादा' ८ जुलैपासून दररोज रात्री ८.३० फक्त आपल्या मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.