*वसू-आकाशचा संगीत सोहळा 'पुन्हा कर्तव्य आहे' च्या लग्न सराई विशेष*
June 01, 2024
0
*वसू-आकाशचा संगीत सोहळा 'पुन्हा कर्तव्य आहे' च्या लग्न सराई विशेष*
झी मराठीवर लग्न सराई विशेष भाग सुरु आहेत आणि ह्यासोबत झी मराठी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देत आहे. वसू-आकाशच्या लग्न कार्याची सुरुवात झाली आहे, पहिला सोहळा आहे संगीताचा ज्यात वर आणि वधू पिवळ्या रंगाच्या पेहेरावात तयार झाले आहेत आणि त्यांची साथ देत आहे चिनू, मिनू आणि बनी जे आपल्या आई-बाबां प्रमाणेच तयार झाले आहेत. चिनू-मनू जरीही आपल्या बाबाच्या लग्नात खुश नसल्या तरीही तयार होण्याची संधी त्यांनी ही शोधली नाही.
वसुंधरा जरी ही उदास दिसत असली तरी तिचा तो पिवळ्या रंगाच्या लेहेंगा आणि तिची सुंदर केशरचना तिच्या चेहऱ्याची चमक वाढवत आहे. संगीत मध्ये वसू-आकाशचा एक खास डांस परफॉर्मन्स पाहायला मिळेल. इतकेच नाही तर घरात ले लहान- मोठे सर्वच आपल्या नृत्याची एक झलक या संगीत मध्ये देणार आहेत. पण इथे ही तानिया ने गोंधळ घातला आहे. आता तानियाने घातलेला गोंधळ वसू-आकाशच्या लग्न कार्यात मीठचा खडा टाकेल का? पाहायला विसरू नका वसू-आकाशचा संगीत सोहळा 'पुन्हा कर्तव्य आहे' च्या लग्न सराई विशेष भागात रात्री ९:३० वा. फक्त झी मराठी वाहिनी वर