रिषी आणि लक्ष्मीच्या आयुष्यात नवीन वळण आणण्यासाठी झी टीव्हीवरील ‘भाग्यलक्ष्मी’मध्ये परख मदनचा प्रवेश
June 05, 2024
0
रिषी आणि लक्ष्मीच्या आयुष्यात नवीन वळण आणण्यासाठी झी टीव्हीवरील ‘भाग्यलक्ष्मी’मध्ये परख मदनचा प्रवेश
भाग्यलक्ष्मीमधील #RishMi ह्या हॅशटॅगसह लोकप्रिय असलेले ऐश्वर्या खरे (लक्ष्मी) आणि रोहित सुचांति (रिषी) यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले असून त्यांची नावे घरांघरांत पोहोचली आहेत. हल्लीच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की कसा रिषी हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे की काय खरंच पारो (त्रिशा सारडा) त्याचीच मुलगी आहे, पण लक्ष्मी त्याच्यापासून सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, असं दिसतंय की आता ह्या मालिकेतील नीलम (स्मिता बन्सल) ची बहिण आंचलच्या रूपात परख मदनच्या प्रवेशासह प्रेक्षकांना भरपूर सारे नाट्य पाहायला मिळणार आहे. लक्ष्मीला आता आपला मुलगा रिषी पुन्हा एकदा भेटणार असल्याच्या चिंतेत असलेल्या नीलमची काळजी घेण्यासाठी ती आली आहे.
परख मदन गेल्या दोन दशकांपासून टेलिव्हिजन उद्योगाचा भाग राहिली असून ती आता ‘भाग्यलक्ष्मी’मध्ये सामिल झाली आहे. ती स्पष्टवक्ती आणि स्वतंत्र स्त्री असून आपल्या बहिणीची तिला अतिशय काळजी आहे आणि तिला सांभाळण्यासाठी ती काहीही करू शकते. नीलमच्या विरोधात कोणीही गेलेले तिला चालत नाही. ती गोड बोलण्याच्या फंदात पडत नाही आणि जे आहे ते स्पष्टपणे सांगते. आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी ती कुठल्याही स्तराला जाऊ शकते.
परख म्हणाली, “झी टीव्हीवर परतताना घरीच परत आल्यासारखे वाटत आहे. माझ्या कारकिर्दीच्या सुरूवात झाल्यापासून त्यांच्यासोबत ही माझी पाचवी मालिका आहे. माझी भूमिका आंचलबद्दल मी अतिशय उत्साहात आहे आणि खऱ्या आयुष्यातही मी बहिण असल्यामुळे तिच्या भावना मला सहजपणे कळतात. आंचल ही आपली बहिण नीलमची काळजी घेण्यासाठी आली असून तिच्यासाठी ती काहीही करू शकते. आपले विचार ती स्पष्टपणे मांडते. तिची आपली अशी मते आहेत आणि ती एक स्वतंत्र स्त्री आहे अगदी माझ्यासारखी.
जेव्हा मला ह्या व्यक्तिरेखेबद्दल कळले तेव्हा मला अगदी माहिती होते की ही भूमिका माझ्यासाठीच आहे. चित्रीकरणाला सुरूवात करून काही दिवस झाले असून सेटवरील सगळ्यांनीच माझी खूप मदत केली आणि माझे मनापासून स्वागत केले. मी दिग्दर्शक मुझम्मिल देसाई यांच्यासोबत मी आधीही काम केले असल्यामुळे त्यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करताना खूप छान वाटतंय.”
परख ह्या नवीन प्रवासाबद्दल अतिशय उत्साहात असून प्रेक्षकांसाठी हे पाहणे रोचक ठरेल की आगामी भागांमध्ये आंचल लक्ष्मीच्या आयुष्यात खूप सारे नाट्य घेऊन येईल.
अधिक जाणून घेण्यासाठी पहा ‘भाग्यलक्ष्मी’ दर सोमवार ते रविवार रात्री 8.30 वाजता फक्त झी टीव्हीवर