दोन नामवंत कलाकारांचं अपहरण
June 04, 2024
0
*दोन नामवंत कलाकारांचं अपहरण*
*कोणी घडवून आणलंय हे सांर.. समजणार लवकरच...*
झी मराठीवर ३ जूनला संध्याकाळी एक ब्रेकिंग न्यूज प्रसारित झाली, ती म्हणजे दोन नामवंत कलाकारांच्या अपहरणाबद्दल. *संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकरचं झालंय अपहरण* . संकर्षण एका जाहिरातीसाठी शूट करत असताना त्याला त्याचवेळी एका वाहनात टाकून नेण्यात आलं. तर दुसरीकडे अमृताला आपल्या व्हॅनिटी मधून बाहेर पडताच तिचे चाहते आणि बॉडीगार्डच्या उपस्थितीत किडनॅप केले गेले. ह्या दोन नामवंत कलाकारांना कुठे आणल गेलंय, खरंच हे दोघांचं अपहरण झालंय की हा कोणता नवीन ड्रामा आहे. हे जाणून घेण्यासाठी बघत राहा झी मराठी.