Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"माझी पहिली कमाई होती १००० रुपये"- तितिक्षा तावडे

*"माझी पहिली कमाई होती १००० रुपये"- तितिक्षा तावडे* प्रत्येकासाठी त्याची पहिली स्वकमाई महत्वाची असते मग तो सर्वसामान्य माणूस असो किंवा सुप्रसिद्ध कलाकार असो. आज सर्वांची लाडकी नेत्रा म्हणजेच तितिक्षा तावडेने आपल्या पहिल्या कमाईची आठवण आणि अनुभव सांगितला *"माझ्या आयुष्यातली पहिली कमाई माझं स्टायपेंड होते जे हॉटेल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमच्या मिळालेलं १००० रुपये आणि ६ महिने स्टायपेंडची बचत करून जेव्हा ६००० जमा झाले मी जाऊन माझे हेअर स्ट्रेट केले. तेव्हा ती माझी गरज होती आणि मला त्याच्यासाठी आई-बाबांचे पैसे वापरायचे नव्हते. माझा कोर्स पूर्ण झाल्यावर मी एका प्रसिद्ध फूड चेनच्या आउटलेटसाठी ट्रेनी म्हणून काम केलं तिथे माझा पगार होता ११५००. मला लक्षात आहे मी आई- बाबा आणि ताईसाठी कपडयांची खरीदी केली होती. मला गिफ्ट्स घ्यायला खूप आवडतात त्यामुळे मी खूप खुश होते. आज 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेमुळे जी प्रसिद्धी आणि प्रेम मिळत आहे. माझा प्रवास पाहून मी त्या काळाच्या तितिक्षाला म्हणेन की "काळजी करू नकोस तू छान करत आहेस. मला तुझा अभिमान आहे! "*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.