Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात ज्येष्ठ नाट्यरसिकांसाठी विशेष सुविधा

*यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात ज्येष्ठ नाट्यरसिकांसाठी विशेष सुविधा*
नाटकातून नाट्यरसिकांना वेगळी अनुभूती मिळत असते. मात्र आवड असूनही वयोमानामुळे आणि शारीरिक व्याधींमुळे ज्येष्ठ नाट्य रसिकांना प्रयोगाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. अशा रसिकांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय नाट्यपरिषदेने पुढाकार घेतला आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून नूतनीकरणानंतर नाट्यरसिकांसाठी २२ जूनपासून खुल्या होणाऱ्या माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे एका विशेष सुविधेची व्यवस्था ज्येष्ठ नाट्यरसिकांसाठी करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नाट्यरसिकांच्या सोयीसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने जिन्यावर सरकत्या खुर्चीची सोय केली आहे. या सुविधेमुळे नाटक बघण्यासाठी इच्छुक ज्येष्ठ नाट्यरसिकांना खूप फायदा होणार आहे. ज्या रसिकांना जिने चढणं शक्य नाही असा रसिकांना या सरकत्या खुर्चीच्या मदतीने पहिल्या माळ्यावर सहजरित्या पोहचता येणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल हे महाराष्ट्रातील पहिले नाट्यगृह जिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रसिकांच्या आवडीचे आणि हक्काचे नाट्यगृह असणारे यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलाचा बदलता चेहरामोहरा नाट्यरसिकांना सुखावणारा असून अखिल भारतीय नाट्यपरिषदेने सुरु केलेल्या या सुविधेमुळे अधिक फायदा होणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुला प्रमाणे अन्य नाट्यगृहात ही सुविधा सुरु करण्याचा मानस असल्याचे नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले. नाट्यरसिकांमध्ये ज्येष्ठ नाट्यरसिकांची संख्या अधिक असते. वयोमानानुसार शारीरिक अडचणींमुळे त्यांना चांगल्या नाटकाला मुकावं लागू नये यासाठी आम्ही हे पाऊल उचललं असल्याचे प्रशांत दामले यांनी सांगितले. आपला,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.