Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

झी टीव्हीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गये’मध्ये विराटच्या पूर्व–पत्नीच्या रूपात प्रतिक्षा होनमुखे

झी टीव्हीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गये’मध्ये विराटच्या पूर्व–पत्नीच्या रूपात प्रतिक्षा होनमुखे झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कैसे मुझे तुम मिल गये’ मधून अमृता (सृती झा), एक साधारण घरातील महाराष्ट्रीय मुलगी, जिचा लग्नसंस्थेवर आणि नातेसंबंध टिकवण्यासाठी त्यावर मेहनत घेण्यामध्ये विश्वास आहे तर दुसऱ्या बाजूला विराट, दिल्लीमध्ये राहणारा एक पंजाबी व्यावसायिक, ज्याच्या मते स्त्रिया ह्या मुळातच पैशांच्या मागे धावणाऱ्या असतात आणि त्यामुळे त्याचा लग्नसंस्थेवरील विश्वास उडाला आहे, अशा दोघांच्या आयुष्यांवर प्रकाश टाकला जात आहे. हल्लीच प्रेक्षकांनी अमृता आणि विराट यांचे ‘खोटे’ लग्न पाहिले ज्यात ते दोघेही त्यांचे एकमेकांसोबतचे फोटोज ‘लीक’ करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात आहेत. अमृताला कळते की गुन्हेगार विराटची आई बबिता (किशोरी शहाणे) आहे, पण विराट ही गोष्ट मानायला नकार देतो. त्याला वाटतं की केवळ पैशांसाठी अमृता त्याच्या आईवर हा खोटा आरोप करत आहे. त्याची पूर्व–पत्नी प्रियांकाप्रमाणे अमृताही संधीसाधू आणि भौतिकवादी आहे. त्यामुळे अनेक गोष्टी घडत जातात आणि रागाच्या भरात अमृताला आयुष्यभराचा धडा शिकवण्याच्या हेतूने विराट अमृतासोबत लग्न करतो.
ह्या मालिकेत प्रियांकाच्या रूपात प्रतिक्षा होनमुखेच्या भव्य प्रवेशासह आता प्रेक्षकांना अनेक सरप्राईजेसना सामोरे जावे लागणार आहे. प्रियांका ही दक्षिण दिल्लीची मुलगी असून तिला पहिल्यापासूनच श्रीमंत माणसासोबत लग्न करण्याची आणि सुखवस्तू आणि आरामदायी आयुष्य जगण्याची इच्छा होती. ती विचारही करू शकणार नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक संपत्ती असलेल्या आपल्या कॉलेजमधील मित्र विराटला तिने लग्नासाठी निवडले. एकुलती एक मुलगी असलेल्या प्रियांकाचे सगळे लाड पुरवले जात होते आणि तिला जे हवे ते मिळत होते. विराटच्या भूतकाळातील समस्यांबद्दल ह्या मालिकेने आधीच संकेत दिले असून त्यात त्याच्या पूर्व–पत्नीचाही उल्लेख करण्यात आला आहे, जिच्या मनात पैशाचा हव्यास आहे आणि जिच्यामुळे एकूणच स्त्रियांकडे पाहण्याचा विराटचा नकारात्मक दृष्टीकोन बनतो असेही सांगण्यात आले आहे.आता, इतक्या वर्षांनंतर प्रियांकाच्या अनपेक्षितपणे परत येण्याने गोष्टी नक्कीच ढवळून निघतील. अमृता आणि विराटच्या लग्नाबद्दल जेव्हा तिला कळेल तेव्हा काय होईल?
प्रतिक्षा होनमुखे म्हणाली, “‘कैसे मुझे तुम मिल गये’च्या कलाकारांमध्ये सामिल होताना मी अतिशय उत्साहात आहे. मी ह्या मालिकेत प्रियांका बाजवा ह्या दक्षिण दिल्लीमधील मुलीची भूमिका साकारणार आहे. तिने कायमच आरामदायी आयुष्य जगलेले असून ती विराटची पूर्व–पत्नी आहे. ती धूर्त आणि तिला जे हवे ते मिळवते. आता विराटच्या आयुष्यात प्रियांकाच्या परत येण्याने कथानकाला निश्चितच वेगळे वळण लाभेल. मी काही लूक टेस्ट्‌स केल्या आणि टीमने माझ्या व्यक्तिरेखेसाठी निवडलेले पोशाख मला खूपच आवडले आहेत. ह्या व्यक्तिरेखेला उलगडून पाहण्यासाठी मी उत्साहात असून प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असेल हे जाणून घेण्यासाठीही उत्सुक आहे.” पहा ‘कैसे मुझे तुम मिल गये’ दररोज रात्री 10 वाजता फक्त झी टीव्हीवर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.