*'खुलेआम इश्क' या गाण्यातुन पडतेय विशाल फाळे आणि तृप्ती राणे यांच्या रोमँटिक अंदाजाची भुरळ*
June 24, 2024
0
*तुम्ही केलं आहे का खुलेआम इश्क?, पाहा गावभर पसरलेल्या अनोख्या प्रेमाची कथा 'खुलेआम इश्क' या गाण्यातून*
*'खुलेआम इश्क' या गाण्यातुन पडतेय विशाल फाळे आणि तृप्ती राणे यांच्या रोमँटिक अंदाजाची भुरळ*
*गावभर चर्चेत असलेल्या 'खुलेआम इश्क' गाण्याला मिळतेय प्रेक्षकांची पसंती*
"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं" या वाक्याने प्रेमाची परिभाषा अगदी हुबेहूब मांडली आहे. तरुणाईच्या खुलेआम प्रेमाची व्याख्या नक्की काय आहे याचा उलगडाही एका नव्या कोऱ्या रोमॅंटिक गाण्यातून झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'खुलेआम इश्क' या गाण्याने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. अशाच प्रेमाची चर्चा गावभर पसरलेल्या एका प्रेमी युगुलाभोवती फिरणार रंजक कथानक या गाण्यातून पाहायला मिळत आहे.
अभिनेता विशाल फाळे व अभिनेत्री तृप्ती राणे या गाण्यात खुलेआम इश्कमध्ये रंगून गेले आहेत. विशाल आणि तृप्तीच्या अनोख्या लव्हस्टोरीची झलक साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. या रोमँटिक गाण्याचे दिग्दर्शन आणि गाण्याचे बोल गणेश व्हटकर यांचे आहे. तर दिग्दर्शक रोहित जाधव यानेदेखील गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर संपूर्ण गाण्याच्या संगीताचीही जबाबदारी गणेश व्हटकर यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. गायक कुणाल गांजावाला आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात हे गाणं स्वरबद्ध केलं आहे. *विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर कुणाल गांजावाला यांनी मराठी गाणं गायलं आहे. या गाण्याची निर्मिती एरिक आणि विण्मयी म्युझिक यांनी केली आहे.*
खुलेआम इश्क करत गावभर चर्चा झालेल्या या प्रेमीयुगुलाची ऐकावीशी वाटणारी lovestory साऱ्यांना थिरकायला भाग पाडत आहे. हे गाणं 'विन्मयी म्युझिक' या युट्युब चॅनेलवरुन प्रदर्शित करण्यात आलं आहे. गाण्याच्या हटके अशा हुकस्टेपनेही साऱ्यांचं मन जिंकलं आहे. कमी वेळात हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे. तर 'खुलेआम इश्क' हे गाणं तुम्हाला आवडलं का?, तुम्ही कधी खुलेआम इश्क केलं आहे का?, आम्हाला नक्की सांगा.