‘रमा राघव’ मध्ये रंगणार पारंपारिक फुगड्यांची स्पर्धा
June 23, 2024
0
‘रमा राघव’ मध्ये रंगणार पारंपारिक फुगड्यांची स्पर्धा
‘रमा राघव’ मालिकेत सोमवार 24 जूनच्या भागात पारंपारिक फुगड्यांची स्पर्धा रंगणार आहे.
रमाची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा पुरोहितांच्या पारंपारिक रीतिरिवाजांनी संपन्न होत असून त्याचाच एक भाग असलेली पारंपारिक फुगड्यांची स्पर्धा खास रंगणार आहे.
रमा ही स्पर्धा जिंकणार की पुरोहितांची थोरली सून म्हणून घरात दाखल झालेली पद्मिनी हा मान मिळवणार हा उत्कंठावर्धक सामना या भागांमध्ये पाहायला मिळेल. रमाच्या चांगुलपणामुळे सहानभूती मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या पद्मिनीचे खरे रूप यानिमित्ताने रमासमोर यावे ही प्रेक्षकांची अपेक्षा या निमित्ताने पूर्ण येईल का याचीही उत्सुकता आहे.
रमा राघवच्या गोड खट्याळ प्रेमाची गोष्ट, प्रेक्षकांना आपलेसे वाटणाऱ्या पुरोहित कुटुंबासह सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर उलगडते आहे.