किडनॅप झालेले दोन नामवंत कलाकार 'ड्रामा ज्युनियर्स' च्या मंचावर !*
June 09, 2024
0
*किडनॅप झालेले दोन नामवंत कलाकार 'ड्रामा ज्युनियर्स' च्या मंचावर !* *संकर्षण कऱ्हाडे, अमृता खानविलकर आणि श्रेया बुगडे 'ड्रामा ज्युनियर्स' मंचावर*
झी मराठीवर ३ जूनला संध्याकाळी एक ब्रेकिंग न्यूज प्रसारित झाली, ती म्हणजे दोन नामवंत कलाकारांच्या अपहरणाबद्दल. संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकरचं झालंय अपहरण. संकर्षण एका जाहिरातीसाठी शूट करत असताना त्याला त्याचवेळी एका वाहनात टाकून नेण्यात आलं. तर दुसरीकडे अमृताला आपल्या व्हॅनिटी मधून बाहेर पडताच तिचे चाहते आणि बॉडीगार्डच्या उपस्थितीत किडनॅप केले गेले. तर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार हा सगळं कारनामा केला होता आपल्या छोट्या बचे कंपनीने. आता ही लहान मुलं आणखी काय ड्रामा करणार हे लवकरच कळेल. पण ह्या शो च्या निमित्ताने ‘संकर्षण कऱ्हाडे’ आणि ‘अमृता खानविलकर’ हे ह्या रिऍलिटी शो चे परीक्षक असणार आहेत तर सूत्रसंचालनाची धुरा श्रेया बुगडे सांभाळणार आहे. .
*तेव्हा पोरांचा ड्रामाच करणार कारनामा बघायला विसरू नका 'ड्रामा ज्युनियर्स' लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर.*