*‘तिकळी’ या सन मराठीच्या नवीन रहस्यमय मालिकेत दिसणार पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर*
June 01, 2024
0
*‘तिकळी’ या सन मराठीच्या नवीन रहस्यमय मालिकेत दिसणार पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर*
*सन मराठीची नवी मालिका ‘तिकळी’, जी ना घरची ना दारची... मग तिचं नेमकं रहस्य काय*
*कौटुंबिक विषयानंतर सन मराठीने गूढ रहस्य विषयात घातला हात; ‘तिकळी’ मालिकेत झळकणार पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर*
एकापेक्षा एक हटके विषय घेऊन येणारी सन मराठी वाहिनी आता अजून काहीतरी नवं करु पाहतेय. कौटुंबिक गोष्ट, सासू-सुनाची कथा, प्रेमकथा या सगळ्या विषयांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना, प्रेक्षकांचे एखाद्या थरारक गोष्टीच्या माध्यमातून मनोरंजन केले तर... असा विचार करत सन मराठी वाहिनी लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला घेऊन येतेय ‘तिकळी’ हा थरारक विषय.
आता ही ‘तिकळी’ कोण किंवा नेमकी काय भानगड आहे, असा प्रश्न पडला असेल तर, ‘तिकळी’ मालिकेची झलक तुम्ही एकदा पाहाच. जिच्यासोबत गावकरी दोन हात लांब राहतात, जिचं आयुष्यात असणं म्हणजे आयुष्य बर्बाद होणं, ना घरची, ना दारची अशी आहे ‘तिकळी’. पण तिकळीचं नेमकं रहस्य काय, तिला दिसणारी ती व्यक्ती कोण, तिच्याशी संबंध न ठेवणं यातच आपले हित असा समज लोकांचा का आहे, इतकी आणि यापेक्षा जास्त मालिकाप्रती कुतुहलता ‘तिकळी’च्या प्रोमोने वाढवली आहे.
अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर या दोघी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तिकळीची भूमिका वैष्णवीने साकारली आहे, पण प्रोमोमध्ये जी व्यक्ती दिसते जिचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे ते पात्रं पूजा साकारत आहे. ‘तिकळी’च्या मागील गूढ सत्य लवकरच सन मराठी वाहिनीवर उलगडणार आहे