Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*माधुरी म्हणतेय ‘नाच गड्या’*

*माधुरी म्हणतेय ‘नाच गड्या’*
मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवारचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या अभिनय नृत्यांतून प्रेक्षकांची मने जिंकणारी माधुरी आता ‘अल्याड पल्याड’ चित्रपटातही आपल्या नृत्याचा जलवा दाखवणार आहे. आपल्या मोहक अदांनी घायाळ करणाऱ्या माधुरीवर एक धमाकेदार आयटम नंबर चित्रीत झालं आहे. ‘दणक्यात साजरा करूया जागर नाच गड्या वाकडा तिकडा रांगडा तू नाच’ असे बोल असलेले हे धमाकेदार गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड झालं आहे.
हे धमाकेदार गाणं शार्दूल यांनी लिहिलं असून ऋचा कुलकर्णी आणि शार्दूल यांच्या दमदार आवाजात ते स्वरबद्ध करण्यात आलं आहे. वी.आर. ऋग्वेद याचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड' चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे.
हे आयटम सॉंग करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग ठेका धरायला लावेल असा विश्वास माधुरीने व्यक्त केला. दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, मकरंद देशपांडे, सुरेश विश्वकर्मा, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत.
कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत.रंगभूषा अभिषेक पवार यांची आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. प्रोडक्शन मॅनेजरची जबाबदारी स्वानंद देव व विष्णू घोरपडे यांनी सांभाळली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.