आदिनाथ चा , " शक्तिमान " प्रदर्शित , समीक्षक - प्रसिध्दी माध्यमांना भावला
May 24, 2024
0
शक्तिमान' मध्ये आदिनाथ कोठारे साकारणार 'सुपरहिरो'? -
चित्रपट प्रदर्शना पूर्वी चर्चांना उधाण
उस्फुर्त प्रतिसाद मिळणार असल्याचे समीक्षकांच्या भाकीत
मुंबई - प्रतिभावान अभिनेता मुकेश खन्ना यांनी १९९७ साली 'शक्तिमान' या मालिकेत भारतीय सुपरहिरो शक्तिमान साकारला होता आणि त्या मालिकेला अफाट प्रसिद्धी मिळाली होती. बच्चेकंपनीमध्ये तर शक्तिमान प्रचंड पॉप्युलर झाला आणि आजही त्याची ख्याती कायम आहे. आता अडीच दशकांनंतर मराठीत शक्तिमान अवतरणार आहेय यामध्ये प्रमुख भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. मग, शक्तिमान' मध्ये आदिनाथ कोठारे सुपरहिरो साकारत आहे का? अर्थात त्याचे उत्तर सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच मिळेल. प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'शक्तिमान' या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित केले होते . हे पोस्टर पाहून प्रेक्षकांना सुपरहिरोचा नवा अवतार बघायला मिळणार? तसेच मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा प्रयोग होतोय का? असे प्रश्न पडू लागले होते .
शक्तिमान'च्या पोस्टरमध्ये आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी दिसत असून त्यांच्यासोबत बालकलाकार ईशान कुंटे दिसत आहे. त्यावरील "बाबा तू होऊ शकतोस सुपरहिरो" ही टॅगलाईन लक्ष वेधून घेतेय. पोस्टरमधील एक हसमुख कुटुंब आणि आदिनाथने घातलेला सुपरहिरोचा लाल रंगाचा केप यामुळे कुतुहूल निर्माण झालेले दिसते. यातील बालकलाकार ईशान कुंटे हा दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा मुलगा असून चित्रीकरण होत असताना तो केवळ ६ वर्षांचा होता. मराठी चित्रपट आणि सुपरहिरो ही संकल्पना नवीन असून जर ती सिनेमात दिसेल तर हा एक अतिशय वेगळा प्रयोग प्रेक्षकांना खूष करेल.
'कॉफी आणि बरंच काही', 'अँड जरा हटके', 'हंपी' आणि 'सायकल' या चित्रपटांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांची 'शक्तिमान' ही नवीन कलाकृती आहे. ते म्हणाले की, "'शक्तिमान' हा एक कौटुंबिक चित्रपट असून त्यातून एक अनोखा संदेश देण्यात आला आहे. आई, बाबा, मुलगा आणि त्या मुलाचा सुपरहिरो बाप याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन तर करेलच परंतु त्यांच्या काळजालाही हात घालेल आणि एक अविस्मरणीय अनुभव देईल."
मोशनस्केप एन्टरटेनमेंटची निर्मिती असलेल्या शक्तिमान चित्रपटाचे प्रदर्शित होण्याअगोदरच झी टॉकीज वाहिनीने याचे सॅटेलाईट राईट्स विकत घेतले आहेत. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, ईशान कुंटे व स्पृहा जोशी यांच्यासह प्रियदर्शन जाधव आणि विक्रम गायकवाड यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.
प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल ?
काल २४ मे रोजी 'शक्तिमान' चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. शनिवार आणि रविवार हे सुट्टीच्या महिन्यातील आठवड्यातील सुट्टीचे दिवस असल्याने साहजिकच मोठ्या शहरांत चांगला प्रतिसाद मिळेल असे समीक्षक सांगतात .