सत्या आणि मंजूच्या लग्नात झाली सेलिब्रिटी किरण गायकवाडची स्पेशल एंट्री
May 21, 2024
0
*सत्या आणि मंजूच्या लग्नात झाली सेलिब्रिटी किरण गायकवाडची स्पेशल एंट्री आणि उडाला भलताच गोंधळ... कसा? पाहा ‘कॉन्स्टेबल मंजू’ सन मराठीवर*
*सन मराठीच्या ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत सगळ्यांची नजर चुकवून सत्या आणि मंजूच्या लग्नात पोहचला सेलिब्रिटी किरण गायकवाड*
सध्या अनेकांच्या घराघरांत, आवडत्या मालिकांमध्ये लग्नसराई चालू आहे. नवरा-नवरी नटून होऊन तयार आहेत, आई-वडील आणि इतर नातेवाईक लग्नाची तयारी कुठपर्यंत आली याच्याकडे लक्ष देत आहेत आणि खास मित्र मंडळी ‘मेरे यार की शादी है’ या मूडमध्ये आहेत. हे प्रसंग प्रत्येक घराघरांत दिसत आहे. आता लवकरच ‘सन मराठी’वरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेत पण लग्न समारंभ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सत्या आणि मंजूच्या लग्नाच्या निमित्ताने या मालिकेत होणार आहे सेलिब्रिटीची एंट्री, ज्याला बघता क्षणी लग्नात उपस्थित पाहुणे त्याच्या पाठी पडणार आणि तो मित्र म्हणजे सत्याचा सच्चा मित्र अभिनेता किरण गायकवाड ज्याच्या येण्याने लग्न समारंभ विशेष गाजणार आहे.
एकीकडे सत्या आणि मंजूच्या लग्नात पोलिस गुंड गण्या फिरंगीच्या शोध मोहिमेवर असतात तर दुसरीकडे लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड पाहुणे मंडळींची नजर आपल्यावर पडू नये आणि थेट सत्याची भेट होऊन देत या हेतून स्वत:चा चेहरा लपवून सत्याच्या लग्नात येतो आणि सत्याला भेटण्यासाठी निघतो. आता पोलिसांच्या तावडीत भेटलेला किरणच्या बाबतीत नेमकं घडणार काय... पाहुण्यांसमोर किरणचा चेहरा सगळ्यांसमोर आल्यावर किरण काय करणार... हे सगळं तुम्हांला जाणून घ्यायचं असेल तर सत्या आणि मंजूच्या लग्नाला तुम्हांला यावंच लागेल. ही सगळी धमाल, गोंधळ, गंमत अनुभवण्यासाठी सामिल व्हा सन मराठी वाहिनीवरील या लग्नसराईत.
मित्र या नात्याने किरणची सत्यासाठी असलेली मैत्रीची जाणीव, आपुलकी प्रेक्षकांना नवीन एपिसोड्समध्ये दिसून येणार आहे. किरण गायकवाडची स्पेशल एंट्री, पोलिसांनी घेरलेल्या किरणची मस्ती, गंमत, सत्या आणि मंजूचं लग्न मिशन उर्फ लग्नसराई पाहा ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेमध्ये २० मे ते २७ मे रात्री ८ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.