‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या पडद्यामागची धमाल*
May 08, 2024
0
*‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या पडद्यामागची धमाल*
मागील अनेक दिवसांपासून अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा खूप चर्चेत होता. संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणारा दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा त्याचा नवीन शो '‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!' कलर्स मराठीवर घेऊन आला आहे.
कार्यक्रमाचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच ताणून धरली होती. शोचे प्रोमो, टिझर आणि शीर्षक गीत रिलिज झाल्यापासून सोशल मीडियावर याबद्दल चांगलीच चर्चा सुरू होती. आता हा शो सुरु झाला असून रसिकवर्ग भाऊ कदम, निलेश साबळे आणि ओंकार भोजने यांना एकत्र मंचावर पाहून आनंद लुटताना दिसत आहेत. एकंदरीत हा नवीन शो प्रेक्षकांच्या पसंतीस उरलेला दिसत असून रसिक या नवीन शोवर भरभरून प्रेम करत आहेत.
नुकताच या शोचा बीटीएस व्हिडीओ समोर आला आहे. रसिकांनी या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद दिला असून कंमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. हे विनोदवीर पडद्यावर तर प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेतच मात्र पडद्यामागेही हे तितकीच धमाल करत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या व्हिडिओमध्ये एपिसोड शूट करतानाची मज्जा, मस्ती आणि धमाल यात दिसत आहे. व्हिडीओत निलेश साबळे , भाऊ कदम, भारत जाधव आणि शोचे प्रोड्युसर देवेन नेगी दिसत असून भाऊ अन् देवेन यांच्यामधील संवाद ऐकून प्रेक्षकांनाही खूप हसू येईल. मज्जा मस्ती सोबत सेटवरची सर्व कलाकारांची मेहनतही तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता.
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोचे लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे यांनी केले. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीर सोबत सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकारांचा देखील समावेश आहे. हा शो शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर तुम्ही पाहू शकता.